Shocking Car Accident : अपघातांचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. यातले काही अपघात हे अंगाचा थरकाप उडवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर अपघाताचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर अपघाताचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक SUV कार हवेत चार वेळा पलटी मारते. सुदैवाने कारचा चालक आश्चर्यकारक बचावला जातो. अपघाताचा हा व्हिडिओ कुवैतमधला आहे. कुवैतमधल्या (Kuwait) अल-कबीर गवर्नरेटमध्ये ही घटना घडली. चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटतं. हा अपघात इतका भीषण होता की चालक कारच्या बाहेर अनेक फूट उंच हवेत फेकला जातो. 


अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ अबू अल हसनिया समुद्रकिनारचा (abu-al-Hasaniya Beach) आहे. व्हिडिओत एक एसयूवी कार समुद्रकिनारी वेगाने येताना दिसतेय. पण पाण्याचा वेग वाढल्याने चालक, कार किनाऱ्याच्या आणखी बाजूला घेण्याचा प्रयत्न करतो. पण यात चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटतं आणि एका क्षणात कार पलटी होते. एक दोनवेळा नाही तर कार तब्बल चार वेळा पलटी मारते. पण आश्चर्यची गोष्ट म्हणजे कारमधल्या चालक आश्चर्यकारकरित्या बचावला जातो. कार पलटी मारत (Car Accident) असताना चालक उंच हवेत फेकला जातो आणि समुद्रात पडतो. चालकाल किरकोळ दुखापत झाल्याचं व्हिडिओत पाहिला मिळतंय. 



अपघातानंतर सुमद्राच्या पाण्यात पडलेला चालक उठून समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने पळतो. त्याला वाचवण्यासाठी अनेक लोकं समुद्रकिनाऱ्याजवळ धाव घेताना या व्हिडिओ दिसतायत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होतात. अग्निशमन दलाच्या मदतीने कार समुद्रातून बाहेर काढण्यात आली. पोलिसांनी कार जप्त केली असून 34 वर्षीय चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली.. 


@Kapyoseiin या एक हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळालेत. अनेक लोकांनी कमेंटस्ही केल्या आहेत. 


लोकांच्या प्रतिक्रिया
या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली आहे, चालकाने सेफ्टी बेल्टचा वापर न केल्याने तो बाहेर फेकला गेला असावा. तर एका युजरने म्हटलंय हा चालक आता वर्षातून दोनवेळा आपला जन्मदिवस साजरा करेल. एका युजरने समुद्रकिनाऱ्यावर स्टंट करणं चांगलंच महागात पडल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.