भारतात `या` ठिकाणी साकारतोय आयफेल टॉवरपेक्षा जास्त उंचीचा रेल्वे पूल
भव्यतेची व्याख्या बदलणारी रचना जगाचे डोळे दीपवणार
मुंबई : भारताकडून काही दिवसांपूर्वीत जगातील सर्वात उंच पुतळ्याचं म्हणजेच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चं अनावरण करण्यात आलं होतं. एकिकडे संपूर्ण जगात या पुतळ्याच्या भव्यतेची चर्चा होत असताना आता पुन्हा एकदा भारतातच साकारल्या जाणाऱ्या अतिभव्य रचनेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच असा रेल्वे पूल उभारण्याचं काम सध्या जोरात सुरु आहे.
हा रल्वे पूल त्याची भव्यता आणि वेगळ्या स्वरुपामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. जगातील आश्चर्यांमध्ये समाविष्ट असणाऱ्या आयफेल टॉवरपेक्षाही या पूलाची उंची जास्त असणार आहे.
आयफेल टॉवरहून हा पूल जवळपास ३५ मीटर उंच आणि एकूण १.३ किमी लांबीचा असेल.
हा पूल पूर्णपणे साकारण्यात आल्यानंतर संबंधित खोऱ्या बऱ्याच दृष्टीने विकास होण्याची चिन्हं आहेत.
कटरा ते बनिहानमधील १११ किमीचं अंतर या पुलामुळे जोडता येणार आहे. त्याशिवाय उधमपूर-श्रीनगर-बारमूलामधील रेल्वे योजनेचही या पूलाचं महत्त्वाचं स्थान आहे.
हवेचा प्रचंड मारा सहन करण्याची ताकद...
जवळपास २४ हजार टनांहून अधिक लोखंडाचा वापरक करत साकारण्यात येणारा हा पूल हवेच्या प्रचंड माऱ्याचा सहज सामना करत उभार राहणार आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात येणारा हा पूर २०१९ मध्ये पूर्णपणे तयार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्याचं वयोमान १२० वर्षे असेल.
हा पूल इतका मजबूत असेल की ८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकपाच्या धक्क्यानेही या त्याला कोणतीच हानी पोहोचणार नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने येत्या काळात भारताकडून संपूर्ण जगासमोर भव्यतेची नवी व्याख्या मांडण्यात येणार आहे, ही बाब नाकारता येणार नाही.