नवी दिल्ली : चीनने पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ ( एलसी) अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याने सैन्याने त्यांना जशास तसे उत्तर दिले. यानंतर भारताला जगभरातील अनेक देशांचे अप्रत्यक्ष समर्थन मिळाल्याचे दिसून येते. शुक्रवारी अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, मालदीव सारख्या देशांनी हिंसक झडपेत मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांप्रती आपली संवेदना व्यक्त केली. चीन विरुद्धच्या कुटनीतीमध्ये हे संदेश महत्वपूर्ण मानले जातायत. गलवानच्या स्थितीबद्दल भारतातर्फे जगभरातील अनेक देशांना वस्तूस्थितीबद्दल अवगत केलं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोकलाम वादादरम्यान जपान, अमेरिकेसहीत अनेक देशांनी भारताचे समर्थन केलं होतं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयातील उपसचिव( इस्ट एशियन व पॅसिफिक अफेअर्स) डेविड स्टिलवेल यांना भारत-चीन सैनिक झडपप्रकरणाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी जगभरातील सर्व देश कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी व्यस्त आहेत. पण चीन याचा फायदा घेत असल्याचे ते म्हणाले होते. 


कोरोना संकटासाठी जगभरातील देशांकडून चीनला जबाबदार धरलं जातंय. त्यामुळे आधीच चीन सर्वांच्या रडारवर आहे. पण भारतीय शहीदांप्रती संवेदना असल्याचे मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी म्हटलंय. चीन आपले शेजारी नेपाळ आणि पाकिस्तानला भारताविरोधात भडकवतोय. तर दुसरीकडे जगभरातील देश भारताच्या बाजुने दिसताहेत.



चीनसोबतच्या झडपेत मारल्या गेलेल्या भारतीय जवानांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करत असल्याचे ट्वीट अमेरिका परराष्ट्र मंत्री मायकल पेम्पिओ यांनी केले. यात मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांप्रती आम्हाला दु:ख असल्याचे ते म्हणाले. 


 भारत-चीन सीमा संघर्ष संपुष्टात येईल अशी भारतातील रशियाचे राजदूत निकोले कुदाशेव आणि रशियाचे उपप्रमुख मिशन रोमन बाबूसकिन यांनी आशा व्यक्त केली आहे.


रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय की, जसं की आपल्याला पहिल्यापासूनच जाणतो की भारत आणि चीन यांच्या सैन्य प्रतिनिधींमध्ये संपर्क आहे आणि ते परिस्थितीबाबत चर्चाही करत आहेत. वाद संपुष्टात आणण्यासाठी उपाययोजनांवरही चर्चा करत आहेत. आम्ही या प्रयत्नांचे स्वागत करत आहोत.