Delhi Wrestlers Protest : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये आंदोलन (Jantar Mantar Wrestlers Protest)  करणाऱ्या कुस्तीपटूंना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं. एवढंच नाही तर त्यांच्यावर एफआयआर  (FIR) देखील दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दंगल भडकावण्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. अशातच आता कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि केरळचे माजी पोलीस महासंचालक (DGP) एनसी अस्थाना यांच्यात शाब्दिक वाकयुद्ध सुरू झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी डीजीपी एनसी अस्थाना (N. C. Asthana) यांनी ट्विट करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. गरज पडल्यास शूटही करू. पण तुझ्या म्हणण्यामुळे नाही. सध्या तो फक्त कचऱ्याच्या पोत्यासारखा ओढून फेकला गेला आहे. कलम 129 पोलिसांना गोळ्या घालण्याचा अधिकार आहे. योग्य परिस्थितीत, ती इच्छा देखील पूर्ण होईल. पण हे जाणून घेण्यासाठी शिक्षित असणं आवश्यक आहे. पोस्टमॉर्टम टेबलवर पुन्हा भेटू, असं वादग्रस्त वक्तव्य एनसी अस्थाना यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद पेटल्याचं दिसतंय.


बजरंग पुनिया म्हणतो...


हे आयपीएस अधिकारी आमच्यावर गोळ्या झाडल्याबद्दल बोलत आहे. समोर भाऊ उभे आहेत, मला सांगा कुठे गोळी मारायला यायचंय. मी शपथ घेऊन सांगतो की, मी पाठ दाखवणार नाही, तुमची गोळी माझ्या छातीवर घेईन. हेच राहून गेलं, आता आमच्याशी वागणं योग्य आहे, असं म्हणत बजरंग पुनियाने माजी डीजीपीसमोर दंड थोपटले आहेत.


आणखी वाचा - Delhi Crime News: प्रेमाचे 40 वार; पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या पण, पिडीतेची आई म्हणते...


पाहा ट्विट 



दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर (Jantar Mantar) लैगिंक शोषणाविरोधात कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जातीये. अनेक कुस्तीपटूंनी याविरुद्ध आवाज उठवला असून अनेक खेळाडूंनी रविवारी झालेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल विचारला जात आहे.