Wrestlers Protest : साधारण 45 दिवसांहून अधिक काळापासून सुरु असणाऱ्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला आता एक नवं वळण मिळालं आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांवरून न्याय मिळण्याची मागणी धरणाऱ्या कुस्तीपटूंनी त्यांच्या संघर्षानं सर्वांच्या नजरा वळवल्या. संपूर्ण देशात क्रिकेटचीच चर्चा सुरु असताना आपल्या मागण्या आणि न्यायासाठी लढणाऱ्या या कुस्तीपटूंनी आता एक नवा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंदोलन मागे घेण्याच्या सर्व चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधीत्वं करणाऱ्या या खेळाडूंनी फेटाळून लावल्या आहेत. 'आंदोलन अद्याप संपलं नसून, न्यायासाठीचा हा लढा इथून पुढंही सुरुच राहील', असं कुस्तीपटू म्हणाले. 


बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांच्यासह इतरही आंदोलनकर्ते खेळाडू पुन्हा एकदा नोकरीवर रुजू झाले आहेत. त्यामुळं त्यांनी या आंदोलनातून काढता पाय घेतला का, हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता राहिला प्रश्न हे खेळाडू भारतीय रेल्वेमध्ये नेमकी कोणती नोकरी करतात याबाबतचा, तर चला जाणून घेऊया खेळाडूंच्या नोकरीबद्दल... 


मोठ्या पदांवर नोकरी करतात हे खेळाडू... 


भारतीय कुस्ती क्षेत्रात नाव कमवलेले हे खेळाडू रेल्वे खात्यात मोठ्या हुद्द्यांवर नोकरीला आहेत. सध्याच्या घडीला टोकियो ऑलिम्पिक विजेता खेळाडू बजरंग पुनिया भारतीय रेल्वेमध्ये विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून सेवेत आहे. तर, त्याची पत्नी - कुस्तीपटू संगीता फोगाट रेल्वे खात्याक क्लर्क पदावर कार्यरत आहे. 


हेसुद्धा वाचा : Rinku Singh: फ्लाइटमध्ये रिंकू सिंगची झाली वाईट अवस्था; व्हिडिओ व्हायरल झाला अन्...पाहा Video


 


महिला कुस्तीपटू आणि रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक Indian Railway मध्ये क्रीडा अधिकारी म्हणू न सेवे आहे. कुस्तीपटूंच्या या आंदोलनात साक्षीला तिचा पती सत्यव्रत कादियान याचीही साथ आहे. तोसुद्धा एक कुस्तीपटू असून, 2014 त्या Commonsealth Games मध्ये त्याला रौप्य पदक मिळालं होतं. तोसुद्धा रेल्वेमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून काम करतो. कुस्ती क्षेत्रातील आणखी एक प्रसिद्ध नाव म्हणजेच खेळाडू जितेंद्र किन्हासुद्धा या आंदोलनकर्त्या खेळाडूंना साथ देत असून, तो रेल्वे खात्यात टीटीई म्हणून कार्यरत आहे. 


विनेश फोगाटचं पद कोणतं? 


आंदोनात सहभागी विनेश फोगाटनं कॉमनवेल्थ आणि आशियायी खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकत उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. विनेश सध्या रेल्वे खात्यात ओएसडी पदावर कार्यरत असून, तिचा पती, कुस्तीपटू- पैलवान सोमवीर राठी हासुद्धा रेल्वेचा कर्मचारी असून, या आंदोलनात तोही पत्नीची साथ देत आहे. सोमवीर रेल्वे खात्यात टीटीई पदावर सेवेत आहे.