नवी दिल्ली : काश्मीर फाईल्सचे (The Kashmir Files) दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलीय. काश्मीर फाईल्स सिनेमाची सध्या देशभरात दोरदार चर्चा आहे. नुकताच सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. (Y category security for 'Kashmir Files' director Vivek Agnihotri)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमामध्ये काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि त्यानंतर निर्वासित झालेले काश्मिरी पंडित याचे कथानक आहे. या सिनेमाचं पंतप्रधान मोदींनी कौतुक केलं होते. आता दिर्गदर्शक विवेक अग्निहोत्रीला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.


 'द काश्मीर फाईल्स'   हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटावरून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. त्यामुळे अनेक वाद पाहायला मिळत आहेत. काहींची विरोधी भूमिका तर अनेकांचे समर्थन याचा वाद पाहायला मिळत आहे. त्यामुळे  गृह मंत्रालयाने वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. इंटेलिजन्स ब्युरोच्या थ्रेट परस्पेक्शन रिपोर्टनुसार, गृह मंत्रालयाने ही सुरक्षा विवेक अग्निहोत्री यांना दिलेली आहे. 


विवेक अग्निहोत्री देशात ज्या-ज्या ठिकाणी जातील, त्या-त्या ठिकाणी हे सुरक्षारक्षक अर्थातच CRPF चे जवान त्यांच्यासोबत असणार आहेत. वाय दर्जाच्या सुरक्षेमध्ये एकूण 8 सुरक्षारक्षक सेवेत असतात. यातील 5 सुरक्षारक्षक त्या व्यक्तीच्या घरी तैनात केले जातात. आता हे सुरक्षारक्षक विवेक अग्निहोत्री यांच्या सुरक्षेत तैनात असणार आहेत.