VIDEO: मंत्री यशोधरा राजे यांची मतदारांना धमकी, पंजाला मत दिल्यास चूल पेटणार नाही
पोट निवडणुकीपूर्वी सरकारमधील मंत्र्याने मतदारांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
नवी दिल्ली : पोट निवडणुकीपूर्वी सरकारमधील मंत्र्याने मतदारांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
मध्य प्रदेशातील शिवराज सरकारमधील मंत्री यशोधरा राजे सिंधिया यांनी कोलारस पोट निवडणुकीपूर्वी मतदारांना धमकी दिली आहे.
...तर तुमच्या घरात चूल पेटणार नाही
मंत्री यशोधरा राजे सिंधिया यांनी म्हटलं की, "जर तुम्ही कमळाला मत दिलं नाही तर तुमच्या घरात चूल पेटणार नाही आणि घरही नसेल."
कोलारस विधानसभा पोट निवडणुकीसाठी २४ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
काँग्रेस खासदारांच्या क्षेत्रात येतो मतदारसंघ
कोलारस विधानसभा क्षेत्र हा काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या क्षेत्रात येतो. भाजपकडून ज्योतिरादित्य यांची अत्या यशोधरा राजे सिंधिया या जोराने प्रचार करत आहेत. त्यामुळे ही निवडणूक सिंधिया विरुद्ध सिंधिया अशी झाली आहे. या निवडणुकीत भाजपने देवेंद्र जैन यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून महेंद्र यादव मैदानात आहेत.
पाहा काय म्हटलयं व्हिडिओत
चूलीची योजना तुमच्यापर्यंत का पोहोचली नाही? भारतीय जनता पक्षाची कमळाची योजना आहे. तुम्ही पंजाला वोट दिलं तर तुमच्याकडे ही योजना येणार नाही. जर तुम्ही पंजाला मत दिलं तर आम्ही तुम्हाला का देऊ घर? आम्ही पंजाच्या हाताने तुम्हाला चूल का देऊ? देणार नाही.
काँग्रेसने शेअर केला व्हिडिओ
मध्यप्रदेश काँग्रेस अध्यक्ष अरुण यादव यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.