अहमदाबाद : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीवर निशाना साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशवंत सिन्हा आता म्हणाले की, १४व्या शतकातील दिल्लीचा सुल्तान मोहम्मद तुघलक यानेही ७०० वर्षांपूर्वी नोटबंदी केली होती. मोदींवर टीका करत ते म्हणाले की, नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला ३.७५ लाख कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. 


ते म्हणाले की, ‘असे कितीतरी राजा होऊन गेले आहेत जे आपली मुद्रा घेऊन आले होते. अनेकांनी नवीन मुद्रा चलनात आणण्यासोबतच जुन्या मुद्रांचं चलनही सुरू ठेवलं. पण ७०० वर्षांपूर्वी शहंशाह मोहम्मद बिन तुघलक एक नवीन मुद्रा घेऊन आला होता आणि त्याने जुन्या मुद्रांचं चलन बंद केलं’.


यासोबतच जीएसटीवर बोलताना त्यांनी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, लोकांनी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल अरूण जेटली यांचा राजीनामा मागितला तर चुकीचं ठरणार नाही. जेटली हे गुजरातच्या जनतेवर ओझं झालं आहेत. सर्व बाबींचा विचार न करता जीएसटी लागू करण्यात आलाय. 


यशवंत सिन्हा यांनी ‘लोकशाही बचाओ आंदोलन’शी निगदीत कार्यकर्त्यांनी नोटबंदी आणि जीएसटीचा प्रभाव आणि अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती यावर बोलण्यासाठी गुजरातमध्ये बोलवलं होतं. ते म्हणाले की, ‘आपले अर्थमंत्री गुजरातचे नाहीयेत आणि ते येथून राज्यसभेवर निवडले गेले आहेत. अर्थमंत्र्यांचा केवळ एकाच गोष्टीवर विश्वास आहे ती म्हणजे ‘चित्त भी मेरी और पट भी मेरी’.