लखनऊ: मदरशांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी बुधवारी या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्ष्य केले. योगी आदित्यनाथांना मदरशांमधील मुलांचा ड्रेस कोड ठरवायचा असेलच तर आधी त्यांनी जीन्स परिधान करावी, असे आझम खान यांनी म्हटले.

मदरशांमध्ये खरंतर हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्माच्या मुलांनी शिकायला पाहिजे, हे माझे मत आहे. मदरशांमध्ये मुलांवर विशिष्ट धर्माच्या अनुकरणासाठी दबाव आणला जात नाही. त्यामुळे योगींनी मदरशांमधील मुलांचा ड्रेसकोड बदलण्याऐवजी स्वत:चाच ड्रेसकोड बदलावा. त्यांनी जीन्स घालायला सुरुवात करावी, असे वक्तव्य आझम खान सांगितले.