लखनऊ : योगी सरकार लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे. योगी सरकारचा हा तिसरा विस्तार असेल. यासाठी भाजप सरकारने नावे निश्चित केली आहेत. लवकरच यूपीमध्ये 6 नवीन मंत्री केले जातील. त्यामुळे निवडणुकीत जातीचे समीकरण जोडण्यात मदत होईल असे बोलले जात आहे.


ही 2 नावे यादीमध्ये सर्वात पुढे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या मंत्र्यांच्या यादीमध्ये जितिन प्रसाद आणि संजय निषाद यांची नावे आघाडीवर आहेत. त्याचबरोबर अन्य काही ओबीसी चेहर्‍यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि संघटनमंत्री सुनील बन्सल यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. शुक्रवारी स्वतंत्र देव सिंह पुन्हा एकदा दिल्लीच्या दौर्‍यावर गेले. स्वतंत्र देव सिंह यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.


पुढील वर्षी विधानसभा निवडणुका


महत्त्वाचे म्हणजे पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने योगी सरकारच्या मंत्रिमंडळात राजकीय आणि जातीय समीकरणाच्या विस्ताराची चर्चा आहे.


काही दिवसांपूर्वीच केंद्रात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यातही यूपीला सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळाले. त्या विस्तारात संजय निषाद यांच्यासारख्या चेहऱ्याला जागा न मिळाल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. आता सूत्रांच्या माहितीनुसार संजय निषाद यांना योगी मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल असे बोलले जात आहे.