मुंबई : श्रीमंत होण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. प्रत्येकाला वाटते की आपला कोटींनी बॅंक बॅलेन्स हवा. मध्यमवर्गीय व्यक्तीसाठी कोटींची रक्कम जमवणे सोपं नसतं. कारण उत्पन्नाप्रमाणेच खर्च सुरू असतो. त्यामुळे बचत कमी होते. आम्ही आज तुम्हाला करोडपती होण्याची गुरूकिल्ली सांगणार आहोत. तुमचे करोडपती बनन्याचे स्वप्न SIPच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. जर रोज तुम्ही फक्त 50 रुपयांची बचत केली तर हे सहज शक्य आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीर्घ अवधीसाठी गुंतवणूक फायद्याची
म्युच्युअल फंड SIP च्या माध्यमातून तुम्ही छोट्या मासिक गुंतवणूकीसह मोठी रक्कम जमा करू शकता. ही योजना दीर्घ अवधीसाठी फायद्याची आहे. करोडपती होण्यासाठी आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये गुंतवणूक सुरू करायला हवी. जर तुम्ही 25 वर्षाच्या वयापासूनच गुंतवणूक सुरू केली तर,  त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.


SIP चे गणित
जर तुम्ही दररोज पैशांची बचत करीत आहात तर महिन्याला 1500 रुपये होतील. म्युच्युअल फंडचा परतावा साधारण 12 ते 15 टक्क्यांपर्यंत असतो. या हिशोबाने जर 35 वर्ष दीर्घ काळापर्यंत तुम्ही गुंतवणूक करीत असाल तर, 6.3 लाख रुपये जमा होतील. यावर 12.5 टक्क्यांच्या परताव्याच्या हिशोबाने गुंतवणूकीची वॅल्यू 1.1 कोटी रुपये होईल.


जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली तर, तुमची गुंतवणूक 5 वर्षे कमी होईल. 30 वर्षे दरमहिना 1500 रुपयांप्रमाणे गुंतवणूक केल्यास 5.4 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. या गुंतवणूकीची 30 वर्षानंतर वॅल्यू 59.2 लाख रुपये होईल. एकूण 5 वर्षाचा अवधी घटला तर तुम्हाला 40 लाखापर्यंत नुकसान होऊ शकते.