UAE जाण्याचा विचार विचार करताय? विमानातून `या` वस्तू नेण्यास बंदी
India to UAE: भारतातून युएईला जाण्याचा विचार करताय. विमान प्रवासापूर्वी तुम्ही कोणत्या वस्तू नेऊ शकता याची माहिती जाणून घ्या.
India to UAE: भारतातील बहुतांश लोक परदेशात स्थायिक झाले आहेत. तर, काही जण उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले आहेत. अशावेळी सुट्टीत भारतात आल्यानंतर घरातून निरनिराळे पदार्थ नेले जातात. तर, कुटुंबातील लोकही प्रेमाने पदार्थ पाठवून देतात. परदेशात आपल्या घरची चव मिळणे कठिण असते तसंच, आपल्या जेवणाचा स्वाद मिळत नाही. अशात तर तुम्ही युएईमध्ये राहाताय तर तुम्हाला या काही गोष्टी विमानातून घेऊन जाता येणार नाहीये.
भारतातून सयुंक्त अरब अमीरात (UAE)मध्ये विमानाने प्रवास करताना काही गोष्टींवर बंदी आणली आहे. त्याची एक लिस्ट जारी करण्यात आली आहे. यात चेक-इन बॅग्समध्ये हमखास आढळणाऱ्या वस्तूंमध्ये नारळ, फटाके, फ्लेयर्स, पार्टी पॉपर्स, माचिस, पेंट, कापूर,तूप, लोणचं आणि अन्य तेलकट पदार्थ यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, ई-सिगारेट, लायटर, पॉवर बँक आणि स्पे बॉटलसारख्या ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणे गुन्हा असल्याचे त्यात नमूद करण्यात आलं आहे.
भारतातून यूएईला प्रवास करणाऱ्या बहुतांश नागरिकांना या नियमांची माहिती असते. या वस्तू विमानातून घेऊन जाण्यावर बंदी असते, याची कल्पनाही काही नागरिकांना नसते. या सर्व वस्तू विमानातून घेऊन जाणे धोकादायक मानले जाते कारण यामुळं विमानात स्फोट होण्याची भीती असते. मागील वर्षी एका महिन्यात प्रवाशांच्या सामानात 943 नारळ सापडले होते. नारळात तेलाचे प्रमाण जास्त असल्याने पेट घेण्याची शक्यता अधिक असते.
2022मध्ये नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने निषिद्ध वस्तूंच्या यादीमध्ये नारळाचा समावेश केला होता. मात्र, असं असतानाही अनेक प्रवाशांना याची माहिती नसते. प्रवासापूर्वी चेक-इन करताना प्रशासनाकडून बॅग ताब्यात घेतल्या जाण्याच्या वाढत्या संख्येवरून असे दिसून येते की नियमित प्रवाशांना फ्लाइटमध्ये बॅन करण्यात आलेल्या प्रतिबंधित किंवा धोकादायक वस्तूंची माहिती नसते.
अधिकारी आता प्रवाशांना विनंती करत आहेत की त्यांनी विमानतळ किंवा एअरलाइन्सने दिलेले नियम समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तसंच, विमानात कोणत्या गोष्टी नेण्यास बंदी आहे व नेल्यास काय कारवाई होऊ शकते हे जाणून घ्यावे. भारत-UAE एव्हिएशन कॉरिडॉर सर्वात व्यस्त आहे, अनेक भारतीय कामासाठी किंवा सुट्टीसाठी आखाती देशांमध्ये प्रवास करत आहेत. याशिवाय सुटीचा हंगाम जवळ आल्याने प्रवाशांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे.