Uttar Pradesh Police Inspiration News: जेव्हा आपण जीवनात यशस्वी होतो तेव्हा इतर लोकांचा विचार करणे बंद करतो. तरी त्यात काही लोक असे असतात की यशस्वी झाल्यानंतरही इतरांच्या भविष्याचा विचार करतात त्यांची स्वप्ने आणि ध्येय पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यतील पोलीस खात्यातील (Uttar Pradesh Police Department) अशाच एक व्यक्तीने जगासमोर उदाहरण तयार केले आहे. पोलीस विभागात नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे समाजातील लोकांनी त्यांचे खुप कौतूक केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमधील या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे विकास कुमार. पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) विकास कुमार यांनी पोलीस खात्यात सामील झाल्यानंतर शाळेतील मुलांना मोफत शिक्षण (Education) देण्याचा निर्णय घेतला. 


पोलीस कॉन्स्टेबल विद्यार्थ्यांना शिक्षण (Education) देण्याची सुरुवात 
या निर्णयानंतर बऱ्याच मुंलानी त्यांच्याकडे येऊन शिकण्याची पंसती दर्शवली. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यातील जवळपास 150 विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला येतात. त्यांच्या या निर्णयाने प्रेरित होऊन स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थीदेखील या समाज कल्याणात विकास कुमार यांची मदत करतात. या सामाजिक मदतीला उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यतील लोक पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) विकास कुमारची कौतूकाने पाठ थोपटवत आहेत. स्थानिक लोक आपल्या मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) विकास यांच्याकडे शिक्षण (Education) घ्यायला पाठवतात.


150 हुन अधिक विद्यार्थ्यांना विकास कुमार शिकवतात
पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) विकास कुमारच्या शाळेत काही विद्यार्थी असे देखील आहेत की ज्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे. पण त्यांचे स्वप्न आहे शिक्षण (Education) घेऊन समाजासाठी चांगले काम करणे. या विषयावर पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) विकास कुमारने सांगितले की उत्तर प्रदेश पोलीस खात्यात सामील झाल्यानंतर मी विद्यार्थ्यांना मोफत शिकवण्याचा निर्णय घेतला. माझ्या शाळेत 150 विद्यार्थी शिकत आहेत. 


स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थीदेखील शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवायला (Education) माझी मदत करतात. पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) विकास कुमारने मीडियाला सांगितले की, या क्षेत्रात त्यांच्याजवळ एकुण 35 हुन अधिक शाळा आहेत. 


समाजात पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) विकास कुमारसारखे नि:स्वार्थ लोक कमीच पाहायला मिळतात. जे फक्त समाजात तरुण पीढीच्या उज्जवल भविष्यासाठी झटत असतात. अशा लोकांचे कौतुक जितके कराल तितके कमीच आहे. अशाच लोकांच्या मदतीमुळे उज्जवल भारत आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न लवकरच पुर्ण होईल.