सॉरी मम्मी, मी चांगली मुलगी नाही... आईला शेवटचा मॅसेज करुन जिम ट्रेनरनं संपवलं आयुष्य
Crime News : प्रेमात अपयशी झालेल्या मुलीने आईला चिठ्ठी लिवून व्यक्त मनातील भावना व्यक्त केली. यानंतर गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सॉरी मम्मी, मी एक चांगली मुलगी नाही... मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली.... आपल्या आईला शेवटचा मॅसेज पाठवून एका जिम ट्रेनरने गळफास लावून आत्महत्या केली. या तरुणीने घरीच गळफास लावून आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी या तरुणींने एक व्हिडीओ तयार केला आहे. ज्यामध्ये तिने आपल्या मृ्यूच कारण सांगितलं आहे. तसेच आईला मॅसेज करुन सर्व प्रकार उघडकीस आणला.
तू त्याला सोडू नकोस
मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी आईला एक मॅसेज पाठवला. ज्यामध्ये लिहिलं होतं की, मम्मी सॉरी मी एक चांगली मुलगी नाही. मी चूक केली आहे. मी चुकीच्या व्यक्तीच्या (हिमांशु यादव) प्रेमात पडले. मी आता जात आहे. तू तुझी काळजी घे. आय रियली लव हिम... पण आई तू त्याला सोडू नकोस. असं सांगितलं जातं की, मुलगी आपल्या बॉयफ्रेंडमुळे हैराण झाली होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या बॉयफ्रेंडशी देखील संवाद साधला होता.
प्रेमात धोका मिळालेल्या व्यक्तीच दुःख
ही गोष्ट प्रेमात धोका मिळालेल्या मुलीची आहे. मृतक मुलगी पदवीधर परिक्षेची विद्यार्थीनी होती. तसेच घराजवळच ती एक जिम ट्रेनर म्हणून कार्यरत होती. ज्यामध्ये जिमच्या मालकाने आणि त्याच्या साथीदारांनी तिला चुकीच्या कामात अडकवलं. तिला मानसिकरित्या दुबळ करुन तिला ब्लॅकमेल केलं. मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, याच मुलांपैकी एका मुलाच्या प्रेमाच्या जाळ्यात मुलगी अडकली होती. तिचं शोषण करण्यात आलं होतं. कंटाळलेल्या या मुलीने गळफास लावून आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवून आपल्या आईला पाठवला. त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली.
मुलीच्या आईने दाखर केली तक्रार
हे संपूर्ण प्रकरण ओराई कोतवाली परिसरातील मोहल्ला गणेशगंजचे आहे. जिथे शनिवारी रात्री उशिरा मुलीने गळफास लावून घेतला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. कुटुंबीयांच्या आरोपानुसार पोलीस कारवाई करत आहेत. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी मुलीचा फोन जप्त केला आहे. ती बॅचलरची विद्यार्थिनी होती आणि तिच्या घराजवळील जिममध्ये ट्रेनर होती. मुलीचा प्रियकर तिच्यासोबत जिममध्ये काम करायचा.
मुलीच्या आईने तिची व्यथा मांडली
मुलीची आई राणीने सांगितले की, तिची मुलगी ओराई येथील अलाहाबाद बँकेजवळील पीली कोठीमध्ये बांधलेल्या नवीन बेअरलेस जिममध्ये काम करत होती. जिम मालक आणि त्याच्या साथीदारांनी माझ्या मुलीला चुकीच्या गोष्टींमध्ये अडकवले. तसेच तिचा मानसिक छळ करून तिला ब्लॅकमेल करत होते. एवढेच नाही तर यातील एका तरुणाने त्याच्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. हे सर्व मिळून माझ्या मुलीला त्रास देत असत. त्याचे शोषण करत होते. तर, माझ्या मुलीचे त्या तरुणावर प्रेम होते. या सगळ्यामुळे माझ्या मुलीने आत्महत्या केली आहे.
मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. सीओ सिटी ओराई उमेशकुमार पांडे यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याशिवाय व्हिडीओ आणि चॅट्सही बघितले जात आहेत. मुलीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून, त्यावरून तपशील काढण्यात येत आहेत. त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.