Swachh Bharat Abhiyaan : प्रवास करताना अनेक जण त्या प्रवासी वाहनात नकळत किंवा मुद्दाम इतकी घाण करतात की सहप्रवासीसुद्धा वैतागतात. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, फळांच्या साली, कागद आणि इतर वस्तू प्रवासी आपला प्रवास संपल्यानंतर तिथेच सोडून देतात. काही वेळा तर प्रवाशांना गाडी लागत असल्याने तिथेच ओकतातही. पण दिल्ली मेट्रोत (Delhi metro) एका विद्यार्थ्याने केलेल्या कृतीने सर्वांचे लक्ष्य वेधलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वच्छतेसंदर्भातील एक फोट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दिल्ली मेट्रोमध्ये एक तरुण मेट्रोमध्ये साफ सफाई करताना दिसत आहे. त्या मुलाकडून त्याचा जेवणाचा डब्बा खाली सांडला होता. त्याने लगेचच खाली सांडलेले साफ करण्यास सुरुवात केली. त्याची ही कृती अनेकांना आवडली. 


हा मुलगा त्याच्या बॅगमधून पाण्याची बाटली काढत होता, तेव्हाच त्याचा टिफिन बॉक्स खाली पडला. टिफीनमधले सर्व अन्न मेट्रोत सांडले. त्यानंतर त्या मुलाने मेट्रोत सांडलेले अन्न कोणतीही लाज किंवा संकोच न बाळगता हाताने साफ केले. त्या मुलाच्या हातातून अन्न पडल्यावर ते साफ करण्याची जबाबदारी आपली आहे हे त्याला समजले. 


लिंक्डइनवर ( LinkedIn) आशु सिंह नावाच्या एका युजरने ही प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे. "दिल्ली मेट्रोमध्ये एक मुलगा कानात इअरफोन लावून बसला होता. पाण्याची बाटली काढत असताना त्याच्या पिशवीतून टिफिन पडला. जमिनीवर अन्न सांडल्यानंतर त्याने वहीतले पान काढले. जमिनीवर पडलेले अन्न उचलले आणि पूर्वीप्रमाणेच रुमालाने ते साफ केले. स्वच्छ भारतचा खरा ब्रँड अॅम्बेसेडर," असे आशु सिंह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


 



दरम्यान, शनिवारी सकाळी शेअर केल्यापासून, पोस्टवर 18,000 पेक्षा जास्त लाईक्स आणि शेकडो कमेंट आल्या आहेत. अनेक युजर्सनी या विद्यार्थ्याच्या जबाबदारीच्या जाणिवेचे कौतुक केले आणि या कृतीचे एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून वर्णन केले.