नवी दिल्ली : मुंबई ही स्वप्ननगरी आहे. इथे अनेकजण आपली स्वप्न साकारण्यासाठी येतात. असाच एक तरुण महानायक अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांचा रिमेक बनवून अभिनेता होण्याचे स्वप्न असलेला एक युवक मात्र अभिनेता न होता खुनी झाला.  दिल्लीतील एका उद्योगपतीच्या हत्येची सुपारी घेतल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुन्नू चौहान असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्यासह त्याचा सहकारी जैल सिंहही अटक करण्यात आली आहे. या दोघांनी एका उद्योगपतीला ठार मारण्यासाठी ५ लाखाची सुपारी घेतली होती. मात्र हत्या करण्यासाठी जात असतानाच त्यांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर चुन्नू वर दरोड्याचा ही आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच द्वारकाजवळ दरोडा टाकून ६ लाख ३० हजार रूपये लंपास केले होते.


पोलीस उपायुक्त शिबेश सिंह यांनी सांगितले की, "एका गँगस्टरने उद्योगपतीला ठार करण्यासाठी चुन्नूला सुपारी दिल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे आम्ही आरोपीला पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त आदित्य गौतम यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केलं. या पथकाने बाईकवरून जाणाऱ्या या दोघांना ताब्यात घेतलं. त्यानंतर धर्मपाल नावाच्या आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली."


उद्योगपतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात झाली. त्यानंतर त्याची ओळख  एका गँगस्टरशी झाली आणि त्याने त्याच्यासाठी काम सुरु केले. गुन्हेगारीतून पैसे मिळवून चित्रपटात काम करण्याची त्याची इच्छा होती. मुंबईत येऊन त्याला चित्रपट निर्मात्यांना आपल्या कल्पना सांगायच्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.