YouTubers Couple Died By Falling From 7th Floor: हरियाणामधील बहादूरगड येथील सेक्टर-3 मधील रुहिल रेसिडन्सी सोसायटीमध्ये युट्यूबर जोडप्याने केलेल्या कथित आत्महत्या प्रकरणामध्ये वेगळीच शंका आता उपस्थित केली जात आहे. 13 एप्रिल रोजी या दोघांचा पहाटे सहाच्या सुमारास इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडून रहस्यमयरित्या मृत्यू झाला. मात्र ही आत्महत्या होती की घातपात की अपघात याचा शोध पोलीस घेत आहेत. तपासादरम्यान या मुलीला आधी खाली फेकून नंतर मुलाने उडी मारल्याची शक्यताही पोलिसांनी नाकारलेली नसून सर्व शक्यता पडताळून पाहत असल्याचं म्हटलं आहे.


सर्वात आधी वयस्कर व्यक्तीने पाहिला मृतदेह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्वित आणि नंदिनी असं मरण पावलेल्या युट्यूबर्स नाव आहे. काही दिवसांपूर्वीच भाडेतत्वावर राहायला आलेल्या गर्वित आणि नंदिनीने अचानक आत्महत्या का केली यासंदर्भातील गूढ अद्यापही उकलेलं नाही. रुहिल रेडिडन्सी इमारतीमध्ये 700 हून अधिक फ्लॅट्स आहेत. मात्र येथील केवळ 200 फ्लॅट्समध्ये लोक राहतात. याच इमारतीमधील एका व्यकस्कर व्यक्तीने सर्वात आधी गर्वित आणि नंदिनीचा मृतदेह पाहिला आणि आरडाओरड सुरु केली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. 


नंदिनीला खाली फेकल्याची शंका?


नंदिनी ज्या पद्धतीने सातव्या मजल्यावरुन खाली पडलेली आढळून आली त्यावरुन तिला खाली फेकण्यात आल्याची शंका इथे राहणारे लोक व्यक्त करत आहेत. आधी गर्वितने नंदिनीला फेकलं आणि त्यानंतर त्याने स्वत: उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही मुलगी खाली पडल्यानंतरही बसलेल्या अवस्थेतच होती. त्यामुळेच अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या शानू नावाच्या महिलेने 'दैनिक भास्कर'ला दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही सगळे गाढ झोपेत होते. त्याचवेळी आमच्या घराची बेल वाजली आणि आमच्या एका मित्राने सोसायटीमध्ये कोणीतरी आत्महत्या केल्याचं सांगितलं. तेव्हा इमारतीतील कोणीतरी बाल्कनीतून उडी मारल्याचं समजलं. सोसायटीमध्ये फारसं कोणी एकमेकांशी बोलत नाही. ते युट्यूबवर काहीतरी करतात हे सुद्धा आम्हाला नंतर कळलं," अशी माहिती दिली.


बाल्कनीची उंची कमी असल्याने अपघात?


सोसायटीमधील इतर सभासदांनी या इमारतीमधील बाल्कनीची उंची कमी होती. त्यामुळेच दोघे खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. येथील बाल्कानीमधील रेलिंगची उंची 3 फुटांहूनही कमी आहे. दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला असावा त्यावेळेस सहज त्यांनी एकमेकांना धक्का दिला असावा त्यातच हा अपघात अडल्याची अधिक शक्यता आहे, असं इमारतीमधील एका वयस्कर व्यक्तीने सांगितलं. 


पोलीस तपासत आहेत सर्व शक्यता


बहादुरगडचे डीसीपी मयंक मिश्रा यांनी, ही आत्महत्या आहे की यामागे काही वेगळी कारणं आहेत का याचा शोध घेत असल्याचं सांगितलं. प्रथमदर्शनी तरी ही आत्महत्या वाटत आहे. कुटुंबाने कोणासंदर्भातही शंका व्यक्त केलेली नाही. दोघांमध्ये काहीतरी वाद झाल्याचं त्यांच्याबरोबर राहणाऱ्या मित्रांनी सांगितलं. आम्ही सध्या तपास करत आहोत. आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत, असंही मिश्रा म्हणाले. मात्र आधी मुलीला खाली फेकलं आणि त्यानंतर स्वत: उडी मारल्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे संकेत मिश्रा यांनी दिलं. 


सीसीटीव्ही कॅमेरा नाही


मिश्रा यांनी सोसायटीमध्ये कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याची माहितीही दिली. ज्यावेळेस हे दोघे सातव्या मजल्यावरुन पडले तेव्हा कोणीही त्यांना पाहिलं नाही. म्हणून आम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट्सकडून मदत घेत आहोत. यामधूनच काय तो खुलासा होईल, असंही मिश्रा यांनी सांगितलं.