Elvish Yadav Rave Party :  बिगबॉसविजेता आणि युट्यूबर एल्विश यादवला रेव्ह पार्टीत (Rave Party) नशेसाठी सापाचं विष (Snake Venom) पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा रेव्ह पार्टीचं प्रकरण चर्चेत आलं आहे. रेव्ह पार्टीचं नाव अनेकवेळा कानावर आलं असेल, पण रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं, हे बऱ्याच जणांना माहित नाहीए. ही पार्टी सामान्य नसते, या पार्टीत केवळ डान्स, ड्रिंक्स आणि फूडची मजा घेतली जात नाही तर, बरंच काही होतं. भारतात रेव्ह पार्टीवर बंदी (Rave Party Ban in India) आहे. यानंतरही अनेकवेळा लपूनछपून अशा पार्ट्या आयोजित केल्या जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेव्ह पार्टी म्हणजे काय?
रेव्ह पार्टी केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या पार्टीत साधारणत:  श्रीमंत घरातील तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. कारण यासाठी लाखोत पैसा खर्च केला जोता. सामान्य घरातील याचा विचारही करु शकत नाहीत. सामान्य पार्ट्यांपेक्षा रेव्ह पार्टी खूप वेगळी असते. या पार्टीत वेगवेगळ्या प्रकारशी नशा केली जाते. गांजा, चरस, कोकेन, हशीश, एलएसडी, मेफेड्रोन यासारख्या ड्रग्सचा वापर केला जातो. आता एल्विश यादवमुळे रेव्ह पार्टीत नशेसाठी सापाच्या विषाचाही वापार केला जात असल्याचं समोर आलं आहे.  या ड्रग्जचा परिणाम माणसाच्या शरीरावर 7 ते 8 तासांपर्यंत राहतो. त्यामुळे पार्टीत सहभागी झालेले तरुण-तरुणी अनेक तास बेधुंद होऊन नाचत असतात. पार्टीच्या आयोजकांकडूनच ड्रग्ज उपलब्ध करुन दिलं जातं. 


कशी आयोजित केली जात रेव्ह पार्टी?
या पार्टीतल माहोल असा तयार केला जातो की तरुण-तरुणी अनेक तास नशेत नाचत राहतात. रेव्ह पार्टीचं आयोजन अधिक लपुनछपून केलं जातं. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सिक्रेट ग्रुप बनवून त्या सर्कलमधल्याच लोकांना बोलावलं जातं. बाहेरच्या माणसांना याची खबरही लागत नाही. अनेकवेळा या पार्टीत परदेशी तरुणींना बोलावलं जातं. पार्टीत सहभागी झालेल्या तरुणांबरोबर अश्लिल डान्स करण्याचं काम या तरुणी करतात. यासाठी पार्टीत सहभागी झालेले तरुण-तरुणी लाखो रुपये खर्च करतात. काही महिन्यांपूर्वी आयपीएलमधल्या दोन खेळाडूंना रेव्ह पार्टीत सहभागी झाल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. 


भारतात रेव्ह पार्टीला कायद्याने बंदी आहे. या पार्टीचं आयोजन आणि सहभागी झालेलं आढळल्यास शिक्षेची तरतूद आहे. भारतात अशा अनेक पार्ट्यांवर नार्कोटिक्स विभागाने कारवाई केली आहे. देशात मुंबई, पुणे, खंडाळा, बंगळुरु, पुष्कर आणि दिल्ली या मोठ्या शहरांमध्ये रेव्ह पार्टी आयोजित करण्याचं प्रमाण जास्त आहे. महानगरातील तरुण-तरुणींमध्ये रेव्ह पार्टीची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.