Lok Sabha Election : तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्व 42 जागांसाठी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीचा उमेदवार असणार आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्याविरोधात युसूफ पठाणला उमेदवारी देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणही यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील सभेत युसूफ पठाणच्या नावाची घोषणा केली. टीएमसीने पठाणला बहरामपूरमधून उमेदवारी दिली आहे. या जागेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी हे खासदार आहेत. प्रसिद्ध क्रिकेटपटू युसूफ पठाणला निवडणुकीच्या मैदानात उतरवून ममता बॅनर्जींनी मोठी खेळी खेळली आहे.



उमेदवारांच्या यादीत ममता बॅनर्जी यांनी 32 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींनी आपल्या उमेदवारांमध्ये मोठा फेरबदल केला आहे. चित्रपट अभिनेत्री रचना बॅनर्जी यांना हुगळीतून तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय माजी आयपीएस अधिकारी प्रसून बॅनर्जी मालदा उत्तरमधून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी नुसरत जहाँचे तिकीटही कापण्यात आले आहे.


तृणमूलच्या उमेदवाराचीं यादी


कूचेबिहार – जगदीशचंद्र बसुनिया


अलीपुरद्वार - प्रकाश शीख बराईक


जलपाईगुडी – निर्मल चंद्र राय


दार्जिलिंग - गोपाल लामा


रायगंज- कृष्णा कल्याणी


बालूरघाट – बिप्लब मित्र


मालदा उत्तोर - प्रसून बॅनर्जी 


मालदा दक्षिण - सहनवाज अली रेहान


जंगीपूर- खलीलुर रहमान


बेरहामपूर- युसूफ पठाण


मुर्शिदाबाद – अबू ताहेर खान


कृष्णनगर- मोहुआ मोईत्रा


राणाघाट – मुकुटमणी अधिकारी


बोंगा - विश्वजीत दास


बॅरकपूर - पार्थ भौमिक


दम दम - प्रा सौगता रॉय


बारासात – डॉक्टर काकोली घोष दस्तीदार


बशीरहाट - हाजी नुरुल इस्लाम


जयनगर- प्रतिमा मंडळ


मथुरापूर - बापी हलदर


डायमंड हार्बर - अभिषेक बॅनर्जी


जादवपूर- सयोनी घोष


कोलजकाता दक्षिण - माला रॉय


कोलकाता उत्तर - सुदीप बॅनर्जी


हावडा - प्रसून बॅनर्जी (माजी फुटबॉलपटू)


उलुबेरिया- सजदा अहमद


श्रीरामपूर- कालियान बॅनर्जी


हुगली – रचना बॅनर्जी


आरामबाग- मिताली बाग


तमलूक - देबांगशु भट्टाचार्य


कंठी – उत्तम बारीक


घाटाळ- दीपक अधिकारी (देव)


झारग्राम - कालीपोडो सोरेन


मेदनीपूर- जून मैला


पुरुलिया - शांतीराम महतो


बांकुरा – अरुप चक्रवर्ती


बर्दवान पूरबा- डॉक्टर शर्मिला सरकार


बर्दवान दुर्गापूर- कीर्ती आझाद


आसनसोल- शत्रुघ्न सिन्हा


बोलपुल- असितकुमार मल


बीरभूम - शताब्दी रॉय


बिष्णुपूर- सुजाता मंडल खा