Zee 24 Taas Impact | आसाममध्ये सैन्य भरतीसाठी गेलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुटका
महाराष्ट्रातून आसाममध्ये (Assam) सैन्य भरतीसाठी (Assam Army Recruitment) गेलेल्या तरुणांची अखेर सुटका करण्यात आली आहे.
मुंबई : बातमी आहे झी 24 तासच्या (Zee 24 Taas Impact) इमपॅक्टची. झी 24 तासने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. महाराष्ट्रातून आसाममध्ये (Assam) सैन्य भरतीसाठी (Assam Army Recruitment) गेलेल्या तरुणांची अखेर सुटका करण्यात आली आहे. हे भावी सैनिक आता महाराष्ट्राच्या दिशेने परतत आहेत. सर्व तरुण ट्रेनने रवाना झाले आहेत. (zee 24 taas impact assam government relesed maharashtra student who going in assam for army recruitment)
नक्की प्रकरण काय?
आर्मी भरतीसाठी महाराष्ट्रातून 60 ते 70 विद्यार्थी आसाममध्ये गेले होते. मात्र तिथं आसाम सरकारनं त्यांना सक्तीनं क्वारंटाईन केलं. भरती परीक्षा रद्द झाल्यानंतर आता घरी परतायचं कसं असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडला होता. यासंदर्भात झी 24 तासने वृत्त प्रसारित केलं.
या वृत्ताची दखल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दखल घेत विद्यार्थ्यांची उपाययोजन करणयाचे आदेश दिले. त्यानंतर आता हे सर्व विद्यार्थी ट्रेननं महाराष्ट्राकडे रवाना झाले आहेत. दरम्यान या तरुणांनी झी 24 तासचे आभार मानले आहेत.