नवी दिल्ली : भारतीय सैन्याने लश्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला जिवंत पकडलं आहे. या दहशतवाद्याने आपल्या कबुली जबाबात अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्यामुळे भारतीय सैन्याची ही एक मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे.


झी न्यूजकडे EXCLUSIVE व्हिडिओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवाद्याने आपल्या कबुली जबाबात अनेक खुलासे केले आहेत. याचा EXCLUSIVE व्हिडिओ ZEE न्यूजकडे उपलब्ध आहे.


ट्रेनिंग बाबत खुलासा 


NIA म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनआयए) केलेल्या चौकशीत दहशतवादी मोहम्मद आमिर ऊर्फ अबु हमास याने सांगितले की, तो मोहम्मद हा मूळचा कराचीचा आहे. तसेच तेथे घेतलेल्या ट्रेनिंग बाबतही मोहम्मद आमिरने खुलासा केला आहे.


पुन्हा ट्रेनिंग सेंटरमध्ये दाखल 


दहशतवादी अबु हमासने २०१५ मध्ये पाकिस्तानात २१ दिवसांची ट्रेनिंग घेतली. या दरम्यान तो बंदुक आणि इतर शस्त्रांचा वापर करा करतात हे शिकला. ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याने एक दुकान सुरु केलं होतं मात्र, हे दुकान चाललं नाही. मग तो मुजफ्फराबाद येथे पोहोचला आणि पुन्हा ट्रेनिंग सेंटरमध्ये दाखल झाला. 


हाफिजने दिली होती ट्रेनिंग


अबु हमासने सांगितले की, लश्कर-ए-तोयबाचा चीफ हाफिज सईदने त्याला पाकव्याप्त काश्मीरमध्ये ट्रेनिंग दिली. तसेच ट्रेनिंगच्या सुरुवातीला त्याने AK-४७ चे २०० राऊंड फायर केले होते. 


हंदवाडा येथून अटक


ट्रेनिंगनंतर कराचीमधील या दहशतवाद्याला काश्मीरमध्ये पाठवण्यात आलं. या दहशतवाद्याला भारतीय सैन्याने काश्मीरमधील हंदवाडा येथून अटक केली आहे.


आर्थिक परिस्थिती हालाकीची असलेल्यांना तरुणांना लश्कर-ए-तोयबा निवडतं आणि त्यानंतर त्यांना ट्रेनिंग दिली जाते अशी माहितीही अबु हमासने दिली आहे.


आठवीपर्यंत शिकलेल्या अबु हमासने सांगितले की, त्याचे वडील पोलीस होते. मात्र, आजारपणामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली.