Exclusive :पगारदार वर्ग प्रामाणिकपणे कर देतो, त्यावरील कराचा बोजा कमी करण्याचे लक्ष्य: अरूण जेटली
आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पावर जेटली यांनी झी मीडियासोबत एक्स्लूसिवक संवाद साधला. या वेळी विचारलेल्या प्रश्नांची जेटली यांनी मनमोकळी उत्तर दिली.
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पावर जेटली यांनी झी मीडियासोबत एक्स्लूसिवक संवाद साधला. या वेळी विचारलेल्या प्रश्नांची जेटली यांनी मनमोकळी उत्तर दिली.
काय म्हणाले जेटली?
अनेक मुद्द्यांवर भाष्य करत जेटली म्हणाले, नोकरदार वर्ग हा प्रामाणिकपणे कर भरत असतो. त्यामुळे त्याच्यावरील करांचा बोजा कमी करणे हे सरकारचे धोरण आहे. आयकरावरील सूट सीमेत न केलेली वाढ, स्टँडर्ड डिडक्शन प्रणाली पुन्हा एकदा लागू करण्याचा निर्णय, जेष्ट नागरिक आणि महिलांना विशेष सूट देण्याबाबतच्या निर्णयावर जेटली म्हणाले, सरकारने सॅलरीड क्लासवर मोठ्या प्रमाणात जोर दिला आहे. सोबतच हेही स्पष्ट केले आहे की, सॅलरीड क्लासवरचा बोजा सरकाकला कमी करायचा आहे.
जेटलींच्या मुलाखतीतील प्रमुख मुद्दे
टॅक्स स्लॅब वाढण्याचे आव्हान.
नागरिकांना बजेटमध्ये करसूट देण्याचा प्रयत्न.
नोकरदार वर्गांसाठी ८,००० कोटी एसडी सवलतही दिली.
नोकरदार वर्ग इमानदारीने कर भरतो.
तीन वर्षात नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला.
नोकरदार वर्गावरचा बोझा कमी करण्याचे मोठे आव्हान सरकारचे लक्ष्य्य आहे.
ज्येष्ठ नागरिकांनाही मोठा आधार. ४,००० कोटींची मदत. सरकारची क्षमता असते तर ही मदत अधिक वाढवली असती.
मध्यम वर्गासाठी अर्थसंकल्पात १२ कोटींचा दिलासा
सरकार आपला खर्च वाढवत असल्याचे अर्थसंकल्प दाखवतो.
सरकारचे प्रामाणीक प्रयत्न
दरम्यान, गेल्या तीन-चार वर्षांमध्ये सरकारने अनेक काम केली. अनेक योजना आणल्या, उपक्रम राबवले. त्यामुळे या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेऊनच यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला. तो तयार करत असताना सरकारने जे उपक्रम सुरू केले. त्यापैकी कोणकोणत्या गोष्टीत कमी राहिली याचा विचार प्रामुख्याने या अर्थसंकल्पात करण्यात आला. हा विचार अत्यंत प्रामाणीत पद्धतीने करण्यात आला, असेही जेटली यांनी सांगितले.