नवी दिल्ली :  क्रीडा जगतात अनन्य साधारण कामगिरी करणाऱ्या आणि उत्कृष्ट योगदान करणाऱ्या महिलांना झी मीडियाचा मानाचा मुजरा... या क्षेत्रात शानदार कामगिरी करणआऱ्या महिलांना सन्मानित करण्यासाठी झी मीडिया तर्फे झी मीडिया फेअर प्ले ( Zee News FAIRPLAY ) कार्यक्रमाचे ताज हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा म्हणाले महिला पुरूषांपेक्षा अधिक सशक्त असतात. त्यांच्या अधिक सहनशक्ती असते. 


 



या कार्यक्रमात भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाला सर्वात प्रथम सन्मानित करण्यात आले. सानिया मिर्झाने दाखविले की भारतीय महिला टेनिसमध्ये इतरांना आव्हान देऊ शकते. सानिया मिर्झा सिंगल, डबल आणि मिक्स डबल सामने खेळते. डबलमध्ये ती जगातील नंबर एक खेळाडू झाली आहे. तीने २०१३ मध्ये सिंगल्समधून निवृत्ती घेतली. 


 


झी मीडिया फेअर प्ले कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेक, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अनुप्रिया पटेल उपस्थित आहे. 



महिला खेळाडूंना पुढे आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील - डॉ. सुभाष चंद्रा


राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा या वेळी म्हणाले,  ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की झी मीडिया महिला खेळाडूंचा सन्मान करीत आहे. महिला या पुरूषांपेक्षा अधिक शक्तीशाली आणि समर्पित असतात. आपल्या समाजात महिलांना कमकुवत मानले जाते. पण महिला कमकुवत नाही तर अधिक सशक्त असतात. आम्ही महिला खेळाडूंना पुढे आणण्यासाठी अधिक प्रयत्नशील आहे. 



झी फेअर प्लेअर पुरस्कार सोहळ्यात बोलताना राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा 



झी फेअर प्लेअर पुरस्कार सोहळ्यात टेनिस स्टार सानिया मिर्झा हिला पुरस्कार देताना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी



झी फेअर प्लेअर पुरस्कार सोहळ्यात बोलताना बॅडमिंटनपटू सायना नेहवाल



झी फेअर प्लेअर पुरस्कार सोहळ्यात नेमबाज अंजली भागवत हिला पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर