गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई; या कंपनीच्या शेअरने बनवले 5 चे 12 लाख!
शेअर बाजारात कधीही काहीही होऊ शकतं. असेच एका तंत्रज्ञान कंपनीच्या शेअरबाबतीत झालं आहे.
मुंबई : शेअर बाजारात कधीही काहीही होऊ शकतं. असेच एका तंत्रज्ञान कंपनीच्या शेअरबाबतीत झालं आहे. या कंपनीच्या1 शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची वर्षभरात मोठी कमाई झाली आहे.
Tech सेक्टरची कंपनी Zensar Techologies च्या शेअरने गेल्या 12 महिन्यात शानदार उच्चांकी गाठली आहे. या कंपनीचा शेअर 3 ऑगस्ट 2020 रोजी 175.70 रुपयांवर होता. सध्या हा शेअर 430 रुपयांवर पोहचला आहे.
Zensar Techologies च्या शेअरच्या शेअर्सने गेल्या वर्षभरात 145 टक्के रिटर्न दिले आहेत.
ज्या व्यक्तीने वर्षभरापूर्वी Zensar Techologiesच्या शेअरमध्ये 5 लाख रुपये गुंतवले असतील. त्या व्यक्तीचे आज 12.23 लाख झाले असते.
कंपनीचे मार्केट कॅपिटलायजेशन 9604.61 कोटी रुपये झाले आहे. तसेच कंपनीची मार्केटमध्ये चांगली पकड आहे. त्याचमुळे जानेवारी-मार्च2021 मध्ये कंपनीला 101 कोटींचा नफा झाला आहे.
MaketsMojoच्या मते Zensar Techologiesवर कर्जाचे ओझे कमी आहे. तसेच कंपनीने आताच 100 कोटीहून अधिकचा प्रॉफिट मिळवल्याने, बाजारात कंपनीचा शेअर बुलिश रेंजमध्ये आहे.