Zerodha Success Story : गेल्या काही वर्षांपासून देशात युवा उद्योजकांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये फ्लिपकार्ट, ओला आणि ओयो यांसारख्या अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या संस्थापकांनी भारतीय बाजारपेठेवर खोलवर छाप सोडली आहे. यामध्ये झिरोधाच्या कामत बंधुंचाही समावेश आहे. शातील सर्वात मोठी ऑनलाइन स्टॉक ब्रोकरेज फर्म झिरोधाचे संस्थापक नितीन आणि निखिल कामथ दरवर्षी करोडो रुपये पगार घेतात. नितीन आणि निखिल कामथ यांनी मिळून 2010 मध्ये झिरोधाची सुरुवात केली होती. दोन भावांचे हे छोटेसे स्टार्टअपचे आज 30,000 कोटी रुपयांचे झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिरोधा सुरू करण्याआधी, नितीन आणि निखिल कामत यांना हे लक्षात आले होते की आगामी काळात देशातील शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढेल आणि डिस्काउंट ब्रोकर्सना मोठी मागणी असेल. कामत बंधुंनी फायनान्सचं औपचारिक शिक्षणही न घेता झिरोधाच्या माध्यमातून एवढी मोठी झेप घेतली आहे.


झिरोधाचे संस्थापक कामत बंधू यांना शेअर्स आणि फायनान्स क्षेत्राशी संबंधित कोणताही अनुभव नव्हता. नितीन कामत हे अभियंता आहेत तर निखिल कामत यांनी शाळेतच शिक्षण सोडले. पण, तरीही त्यांनी स्वत:च्या बळावर देशातील आघाडीची स्टॉक ब्रोकिंग कंपनी स्थापन केली. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही निधीशिवाय सुरू झालेल्या झिरोधामध्ये आजही कोणत्याही फर्मचे पैसे गुंतवले नाहीत. दोन्ही भावांनी स्वबाळवर मिळून ही कंपनी स्थापन केली आणि नफ्यात आणली.


नितीन कामत यांनी वयाच्या 17 व्या वर्षी एका कॉल सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केली. नितीन कामत कॉल सेंटरमध्ये संध्याकाळी चार ते पहाटे एक वाजेपर्यंत काम करायचे आणि सकाळी ट्रेडिंगमध्ये पैसे लावायचे. यादरम्यान त्यांनी शेअर मार्केटबद्दल बरीच माहिती जाणून घेतली. यामध्ये नितीन यांच्या वडिलांनी त्यांना खूप पाठिंबा दिला आणि शेअर बाजारात गुंतवण्यासाठी पैसे दिले. नितीन कामथ यांनी कमी किमतीत उपलब्ध असलेल्या पन्नास शेअर्समध्ये भरपूर पैसे गुंतवले होते. पण, 2001-2002 मध्ये शेअर बाजारात आलेल्या मंदीमुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. नितीन कामत यांनी त्यांच्या कॉल सेंटरच्या सहकाऱ्यांनाही त्यांच्या शेअर मार्केटच्या माध्यमातून पैशाचे व्यवस्थापन करण्यास सांगितले. इथूनच निखिल कामत यांनी स्टॉक ब्रोकिंगच्या कारकिर्दीला सुरुवात केली.


त्यानंतर निखिल कामत यांच्यासोबत मिळून नितीन कामत यांनी झिरोधाची सुरुवात केली. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी त्यांनी भाऊ आणि मित्रांसोबत शेअर ट्रेडिंगचा अभ्यास केला. एवढेच नाही तर निखिल यांनी मित्रांसाठी अॅसेट मॅनेजमेंटचे काम सुरू केले.


कमाई किती?


नितीन आणि निखिल कामथ यांना 2022-2023 या आर्थिक वर्षात 195.4 कोटी मिळाले होते. ही रक्कम दररोजच्या पगाराच्या हिशेबात मोजली तर ती 53 लाखांपेक्षा जास्त येते. entrackr.com च्या अहवालानुसार, झिरोधा सह-संस्थापक आणि संचालक नितीन कामत यांनी कंपनीचे मूल्य 3.6 अब्ज किंवा 30,000 कोटी रुपये केले आहे. निखिल कामत यांनी गेल्या वर्षीच्या हुरुन इंडिया सेल्फ-मेड रिच लिस्टमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. झिरोधाने 2023-24 या आर्थिक वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर 380 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये संचालकांच्या पगाराचाही समावेश आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांवर एकूण 623 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये हा खर्च 459 कोटी रुपये होता. या 623 कोटी रुपयांपैकी 236 कोटी रुपये कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ESOPs वर खर्च करण्यात आले आहेत.


दरम्यान, निखिल कामत वॉरेन बफे, मेलिंडा फ्रेंच गेट्स आणि बिल गेट्स यांनी 2010 मध्ये स्थापन केलेल्या गिव्हिंग प्लेजमध्ये सामील झाले आहेत. निखिल कामत यांनी जूनमध्ये आपली जवळजवळ अर्धी संपत्ती दान करण्याची घोषणा केली होती.