Zomato Delivery Boy Garba Dance: चांगली नोकरी (Job), अपेक्षित पगार (Salary), दोन वेळचं जेवण, मनाला वाटेल तेव्हा वाटेत तिथे जाण्याची मुभा आणि राहण्यासाठी चांगलं घर... हे सर्वकाही असुनसुद्धा तुमच्याआमच्यापैकी बऱ्याचजणांचा रडका सूर काही केल्या कमी होत नाही. आपल्याकडे काय आहे, यापेक्षा आपल्याकडे काय नाहीये यावरच जास्त लक्ष दिल्यामुळं ही परिस्थिती उदभवते. ती कळतेही पण, वळत नाही. पण, याच सवयीला आरसा दाखवणारा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video on social media) झाला आहे. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा म्हणजेच नवरात्रोत्सवाच्या दिवसांमधला आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या अनेकांच्याच चर्चेचा विषय ठरत असून तो नेटकऱ्यांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. (Zomato Delivery Boy Garba Dance Video Viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिष मुळे या युजरनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक झोमॅटो डिलीव्हरी एजंट (Zomato boy) सोसायटीमधून बाहेर पडताना दिसत आहे. त्याच्याकडे पाहता तो डिलीव्हरी पोहोचवूनच निघाल्याचं कळत आहे. तो निघालेला असतानाच गरब्याचे दिवस सुरु होते त्यावेळी एक गाणं सुरु झालं. 


अधिक वाचा : लग्न म्हणजे काय? विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक म्हणाले, जरा येऊन भेट


बस्स, मग काय? '.... आई तुझं देऊलं' हे शब्द त्याच्या कानांवर पडले आणि मित्रानं उत्साहात त्यावर ठेका धरण्यास सुरुवात केली. अवघी काही सेकंद तो या गाण्यावर थिरकला, एक गिरकी घेतली आणि मागून कुणीतरी येत आहे हे लक्षात येताच तो पुन्हा आपल्या वाटेला निघाला. 


अधिक वाचा : अरे देवा! दिवाळीच्या तोंडावरच बड्या कंपनीतील हजारो कर्मचारी नोकरीला मुकणार; Private Sector ला हादरवणारी बातमी 


हा डिलीव्हरी बॉय कोण, हे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत नसलं तरीही तो योगायोगानं कधी तुमच्या घरी डिलीव्हरी देण्यासाठी आला तर तुम्हीही त्याला उत्स्फूर्तपणे 'मित्रा तू जिंकलंस' असंच म्हणाल यात दुमत नाही. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by AshIsh MuLe (@iamparalkar)


झोमॅटोसाठी काम करणाऱ्या या  (Zomato Delivery Boy) व्यक्तीचा व्हिडीओ आतापर्यंत बराच व्हायरल झाला आहे. त्याला 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्यक्तीच्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण पाहताना अनेकांनाच त्याचा हेवा वाटत आहे. खरं आयुष्य तर हा जगतोय, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याच्या मनमुराद जगण्याला दाद दिली आहे.