मुंबई : झोमॅटो बॉयने (Zomato Delivery boy) मॉडेलच्या नाकावर बुक्का मारल्याप्रकरणी त्याला बंगळुरू पोलिसांकडून अटक करण्यात आली. यानंतरच्या चौकशीत डिलिव्हरी बॉयने धक्कादायक खुलासा केला आहे. या खुलासामुळे पोलीसही चक्रावले आहे. झोमॅटो डिलिव्हरी बॉयने पोलिसांच्या तपासात घडलेला सगळा प्रकार सांगितला. 


Zomato बॉयने दिली धक्कादायक माहिती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा मी पार्सल घेऊन या महिलेच्या घरी पोहोचलो तेव्हा थोडा उशिर झाला होता. यासाठी मी त्यांची माफी देखील मागितली. खराब रस्ता आणि वाहतूक कोंडीमुळे पोहोचण्यास उशिर झाला, असे सांगितले. त्यामुळे झोमॅटोवरून मागविलेले जेवण उशिराने आल्याने  मॉडेलने रद्द केले. एवढंच नव्हे तर मॉडेल असलेल्या हितेशा चंद्राणीला कामराजने बुक्का मारला नाही, उलट कामराज येताच हितेशानेच त्याच्यावर हल्ला केला. (Zomato : महिलेला मारहाणीच्या आरोपावरून झोमॅटो डिलिव्हरी बॉय अटकेत) 


 


त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. कामराजला तिने चपलेने मारण्यास सुरुवात केली. याचवेळी तिने तिच्यानाकावर मारून घेतले. तिच्याच हातातील अंगठीमुळे नाकावर जखम झाली आणि रक्त येऊ लागले. या घटनेचा संपूर्ण आरोप तिने कामराजवर लावल्याच डिलिव्हरी बॉयने पोलिसांना सांगितलं. मी दोन वर्षांपासून काम करत आहे, अशा प्रकरच्या घटनेला पहिल्यांदाच तोंड देत आहे, असे कामराज म्हणाला.


त्या दिवशी नेमकं काय घडलं? 


पुढे कामराजने सांगितलं की, 'हितेशाने जेवण ताब्यात घेतले परंतू तिने पैसे देण्यास नकार दिला. ती म्हणाली की ती झोमॅटो कस्टमर सपोर्टशी बोलत आहे. हितेशाने यानंतर त्याला अश्लिल शिव्या दिल्या व जोरजोरात ओरडायला लागली. तर झॉमॅटो सपोर्टने कामराजला ऑर्डर कॅन्सल केल्याचे सांगितले. यामुळे कामराजने तिला जेवण परत करण्यास सांगितले. जेव्हा तिने ते मागे देण्यास नकार दिला तेव्हा तिथून कामराज निघून जात होता. 


तरी देखील ती त्याला शिव्या देतच होती. अचानक तिने डिलिव्हरी बॉयवर चप्पल उगारली आणि मारायला सुरुवात केली. मी तिला रोखण्यासाठी हात पुढे केला. यावेळी तिने चुकून तिचाच हात नाकावर मारला. मी फक्त तिचा वार रोखण्यासाठी हात पुढे केला होता. तिच्या बोटातील अंगठी तिच्या नाकावर लागली. तिचा व्हिडीओ पाहिल्यास त्यामध्ये स्पष्ट दिसेल असेही त्याने पोलिसांना सांगितले.  तिच्या नाकावर जखम झाली ती अंगठीमुळे झाली आहे, मी मारल्यामुळे नाही.