मदुराई : रस्त्यावरील उघडे अन्न पदार्थ खाऊ नका असं म्हटलं जातं पण आता ऑनलाईन फूड डिलीव्हरीचं वास्तवं समोर आलं होतं. झोमॅटो या फूड डिलीव्हरी करणाऱ्या डिलीव्हरी बॉयचा व्हिडिओ काही दिवसांपासून समाज माध्यमात व्हायरल होतोय. यामध्ये तो डिलीव्हरीसाठी आणलेल्या खाद्यपदार्थावरील आवरण काढून त्याची चव चाखताना दिसतोय. या व्हिडिओनंतर झोमॅटोच्या ऑनलाईन फूड डिलीव्हरी बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली. झोमॅटोनेही हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचं दिसतंय.


सोशल मीडियात प्रतिक्रिया 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिलीव्हरी बॉयचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झोमॅटोची चांगलीच नाचक्की झाली. त्यांच्या ऑर्डरवरही याचा परीणाम झाला. हा व्हिडीओ मदुराई येथील असल्याचे सांगण्यात आले. व्हिडिओ बनवणारी व्यक्ती अद्याप समोर आली नसली तरी झोमॅटोने तात्काळ कारवाई करत त्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकलंय. पण यावरुन सोशल मीडियावर मिश्किल प्रतिक्रिया येत आहेत. थोडसंच तर खाल्ल होतं..मग त्याला एवढी मोठी शिक्षा का ? असा प्रश्न काहीजण विचारत आहेत. तसेच खायच तर पूर्ण खायचं...अर्धवट उष्ट कशाला ठेवायचं? असेही काहीजण म्हणत आहेत. तर काहींनी हा मुद्दाच खोडून टाकलाय.  खाद्यपदार्थ वेळेत न मिळणे,  न आवडणे अशा अनेक कारणामुळे डिलीव्हरी रद्द केली जाते. अशावेळी रद्द झालेली डिलीव्हरी जर त्याने खाल्ली तर त्यात वावग काय ? असा प्रश्नही विचारला जातोय. 


टेम्पर प्रूफ टेप


झोमॅटोने याप्रकरणावर पत्रक जारी केलंय. यापुढे असा प्रकार होऊ नये म्हणून टेम्पर प्रूफ टेपचा वापर करण्यात येणार आहे. हा व्हिडिओ मदुराईतील असून झालेला प्रकार धक्कादायक असल्याचे झोमॅटोने सांगितले आहे. हा एकमेव प्रकार असून यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ आणि यापुढे टेम्पर प्रूफ टेपचा वापर करु असे झोमॅटोने म्हटले आहे. यामुळे खाद्य पदार्थाशी मधल्या मध्ये छेडछाड करता येणार नाही. तसेच झोमॅटो आपल्या दीड लाख कर्मचाऱ्यांना यासंदर्भात ट्रेनिंग देण्याचेही सांगितले आहे.