मुंबई : सध्या सोशल मीडियावर Zomato dilivery boy ची खूप चर्चा सुरु आहे. कोण चुकीचं? कोण बरोबर ? अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. अशातच बॅालिवूडमधील काही अभिनेत्री कामराजचं समर्थन करायला पुढे सरसावल्या आहेत. अभिनेत्री परिणीति चोपड़ानंतर आता अभिनेत्री काम्या पंजाबीने ही tweet करून  Zomato dilivery boy चं समर्थन केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काम्या पंजाबीने Tweet मध्ये लिहिले की, त्याच्या डोळ्यातच निरागसता दिसत आहे. त्याची याच्यात काहीही चूक नाही, मला वाटंयं तो Delivery boy निर्दोष आहे. मला विश्वास आहे zomato त्याला न्याय देईल आणि त्याची नोकरी त्याला परत मिळावी ही अपेक्षा. हे वक्तव्य काम्याने तिच्या एका फॅन च्या tweetला Retweet करत केले आहे.



मेकअप आर्टिस्ट हितेशा चंद्रानीने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये तिने सांगितले की ऑर्डर कॅन्सल केल्यामुळे तिला Zomato dilivery boy कामराजने मारले.


ज्यामुळे तिचं नाक फ्रॅक्चर झाला आणि रक्त येऊ लागले. तेव्हा सोशल मीडियावर सगळेच लोक हितेशाला न्याय मिळावा, यासाठी तो व्हिडिओ पोस्ट करत होते. त्यानंतर delivery boy कामराजने एका Interview मध्ये सांगितले की, हितेशाला ती दुखापत तिची स्वत:ची अंगठी लागल्यामुळे झाली. food delivery उशिरा केल्यामुळे हितेशाने त्याच्यासोबत वाद घातला आणि तो वाद वाढल्यामुळे तिनेच त्याला मारायला सुरवात केली.


कामराजच्या या वक्तव्यामुळे कोण चुकीचं आणि कोण बरोबर अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. अशातच  बॅालिवूडमधील काही अभिनेत्री आता कामराजचं समर्थन करायला पुढे सरसावल्या आहेत. सुरवातीला अभिनेत्री परिणीति चोपड़ाने कामराजवर विश्वास दाखवला आणि आता काम्या पंजाबीने ही त्याचं समर्थन केले आहे.