झोमॅटोकडून 1.6 कोटींच्या पॅकेजची ऑफर... नंतर जे झालं ते धक्कादायक!
Zomato Withdraw Job Offer: जॉब ऑफर देऊन ती मागे घेणारी झोमॅटो ही एकमेव कंपनी नाही. याआधी गुगल आणि मेटासारख्या मोठ्या टेक दिग्गजांनी या वर्षाच्या सुरुवातीला असेच केले आहे.
Zomato Withdraw Job Offer: झोमॅटोने अलीकडे बंपर भरतीची घोषणा केली होती. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमेटॉने कॅम्पस प्लेसमेंट दरम्यान अल्गोरिदम इंजिनीअर पोस्ट भरणार असल्याचे सांगितले.या पदासाठी 1.6 कोटी रुपयांचे लक्षवेधी पॅकेज ऑफर केले होते. यानंतर प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली कॅम्पसमध्ये आयआयटी दिल्लीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
आयआयटी दिल्लीतील रिसर्च इंटर्न असलेल्या हृतिक तलवारने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली. आनंदाच्या भरात त्याने हाय-प्रोफाइल नोकरीच्या संधीची घोषणा करणारी एक नोटिफिकेशन शेअर केले. असे असले तरी त्याने याखाली एक दु:खद पोस्ट केली.झोमॅटोने आपली ऑफर त्वरेने मागे घेतली आणि कॅम्पसला धक्का बसला, असे त्याने पोस्टमध्ये लिहिले.
तलवारच्या झोमॅटोने नोटिफिकेशन मागे घेतल्याची पोस्ट सोशल मीडियात लगेच व्हायरल झाली. यावर चर्चा रंगू लागल्या. काही यूजर्सनी पगाराच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही एक टायपोग्राफिकल त्रुटी असू शकते असे काहींनी म्हटले तर इतरांनी झोमॅटोची चतुर मार्केटिंग चाल आहे का? असा अंदाज वर्तवला.
अशाप्रकारे जॉब ऑफर देऊन ती मागे घेणारी झोमॅटो ही एकमेव कंपनी नाही. याआधी गुगल आणि मेटासारख्या मोठ्या टेक दिग्गजांनी या वर्षाच्या सुरुवातीला असेच केले आहे.
या वर्षी जानेवारीमध्ये, मेटाने कंपनीने अशीच पूर्णवेळ नोकरीची जाहिरात केली होती. नियुक्ती प्रक्रिया झाली पण त्यानंतर ऑफर मागे घेण्यात आली होती. मेटासाठी हा निर्णय खूपच कठीण होता पण अधिक महत्त्वाच्या नोकऱ्यांना प्राधान्य द्यायचे होते, असे स्पष्टीकरण देण्यात आले. आम्ही आमच्या नोकरभरतीच्या गरजांचे पुनर्मूल्यांकन केले आणि त्यामुळे काही उमेदवारांना दिलेल्या ऑफर मागे घेण्याचा कठीण निर्णय घेतला आहे, असे मेटा प्रवक्त्याने म्हटले.
गुगल इंजिनीअरलादेखील नोकरीदरम्यान असा अनुभव आला. सुंदर पिचाई यांच्या प्रस्थापित कंपनीत नोकरी मिळाल्याने तो आनंदी होता. पण ई-कॉमर्स कंपनीत सामील होण्याच्या अवघ्या तीन दिवस आधी त्याची नोकरीची ऑफर रद्द करण्यात आल्याची माहिती इंजिनीअरला मिळाली. तुम्ही नवीन नोकरीसाठी आधीची नोकरी सोडता आणि नंतर तीदेखील मिळत नाही, ही कृती अनप्रोफेशनल असल्याचे म्हटले जाते.