PBKS Vs GT Dream11 Team Prediction : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 18 व्या सामन्यात आज गुजरात टायटन्सची (PBKS vs GT) पंजाब किंग्जशी लढत होणार आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर हा सामना पंजाबच्या मोहाली शहरातील 7.30 वाजता सुरु होईल. पंजाब विरुद्ध गुजरात या दोन्ही संघांचा आजचा चौथा सामना असणार आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत 3 पैकी 2-2 सामने जिंकले असून आकडेवारीनुसार गुजरात टायटन्स चौथ्या तर पंजाब  किंग्ज सहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कुणाचं पारड वरचढ असेल... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जला पहिला पराभव स्वीकारावा लागला. तर पंजाब किंग्स हा संघ दोन्ही बाबतीत उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. तर शिखर धवनने शेवटच्या सामन्यात वन मॅन शो खेळला असून नाबाद 99 धावा केल्या. गुजरातविरुद्ध त्याच्या संघाकडून चांगल्या फलंदाजीच्या कामगिरीची अपेक्षा असेल. गेल्या सामन्यात अर्शदीप सिंग आणि राहुल चहर या दोघांनी 1-1 विकेट घेतली होती. तर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मोसमातील पहिला पराभव पत्करल्यानंतर गुजरात टायटन्स पुन्हा विजयाच्या वाटचालीकडे लक्ष असेल. तर रिंकू सिंगने शेवटच्या षटकात 5 षटकार मारून खेळाला कलाटणी दिली.


साई सुदर्शन आणि विजय शंकर यांनी मागील सामन्यात सर्वाधिक धावा केल्या होत्या. अनुक्रमे 53 आणि नाबाद 63 धावा केल्या होत्या. त्यांच्या गोलंदाजांनी चेंडूवर उत्कृष्ट कामगिरी केली. शेवटच्या सामन्यात रशीद खानने 3 तर अल्झारी जोसेफने 2 विकेट घेतल्या होत्या.


खेळपट्टीचा अहवाल 


तसेच आयएस बिंद्रा स्टेडियम हे पंजाब किंग्जचे होम ग्राउंड आहे. त्याचा फायदा पंजाबला होऊ शकतो. तर दुसरीकडे या मैदानाच्या मागील रेकॉर्डवरून असे दिसून येते की कोणत्याही संघासाठी येथे धावसंख्या राखणे फार कठीण आहे. त्यामुळे दोन्ही संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करू इच्छितात. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 180 असेल. आतापर्यंत येथे खेळल्या गेलेल्या 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी चार वेळा 200 हून अधिक धावा झाल्या आहेत.


दोन्ही संघाची संभाव्य Playing 11 


पंजाब किंग्ज :  प्रभसिमरन सिंग, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, सिकंदर रझा/भानुका राजपक्षे, सॅम करण, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, नॅथन एलिस/कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.


गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, जोशुआ लिटल.