SRH vs MI Dream11 Prediction, IPL 2023: आयपीएल 16 (IPL 2023) हंगामातील 25 व्या सामन्यात आज (18 एप्रिल 2023) सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI) आमने-सामने येणार आहेत. हा सामना आज, संध्याकाळी 7.30 वाजता राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार आहे. या दोन्ही संघांनी सुरुवातीचे दोन सामने गमावले होते. मात्र या पराभवानंतर मुंबई आणि हैदराबादने सलग दोन सामने जिंकून लीगमध्ये पुनरागमन केले आहे. आज होणाऱ्या 25 व्या सामन्यात या दोन्ही संघांना विजयाची हॅट्रीक करण्याची संधी आहे. त्यामुळे आजचा सामना कोण वरचढ ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान सनरायझर्स हैदराबादचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध 72 धावांनी पराभव झाला होता. तर दुसऱ्या सामन्यातही हैदराबादने केवळ 121 धावा केल्या. यानंतर हैदराबादच्या फलंदाजीने पुन्हा फॉर्म मिळवला आणि पंजाबविरुद्ध पहिला विजय मिळाला. हैदराबादचा परदेशी खेळाडू हॅरी ब्रूकने कोलकाताविरुद्ध मोसमातील पहिले शतक झळकावले होते. तर मुंबई इंडियन्सची खेळी पाहायला गेलो तर, लीगमध्ये मुंबईची सुरुवात खराब होती. मात्र बेंगळुरू आणि चेन्नईचा पराभव केल्यानंतर मुंबईने सलग 2 सामने जिंकले. अशा परिस्थितीत आज होणाऱ्या सामन्यात कोणता संघ हॅट्ट्रिक करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 


दोन्ही संघांची हेड टू हेड 


मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील आजचा सामना अधिक रोमांचक होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत या दोन्ही संघांनी 19 सामने खेळले असून मुंबईने 10 तर हैदराबादने 9 सामने जिंकले आहेत. 


खेळपट्टीचा अहवाल


राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या शेवटच्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला होता. या मैदानावर फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सामनाच्या दिवशी हैदराबादमधील वातावरण खूप उष्ण असेल. हैदराबागमधील आजचे तापमान 40 ते 26 अंश सेल्सिअस असेल. 


लाइव्ह कधी आणि कुठे पाहाल?


सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज, संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरु होईल. नाणेफेकीची वेळ 30 मिनिटे आधी म्हणजेच 7 वाजता असेल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' अॅपवर उपलब्ध असेल. या अॅपवर तुम्ही फ्री मध्ये हा सामना पाहू शकता. 


दोन्ही संघातील संभाव्य Playing 11 


सनरायझर्स हैदराबाद - हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (क), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, टी नटराजन.


मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (क), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, ड्वेन जॅन्सन, रिले मेरेडिथ