डहाणु: डहाणुनजीकच्या समुद्रात काही दिवसांपूर्वी एक थरारक घटना घडली. यावेळी मच्छिमार पितापुत्रांनी आपल्या प्राणांची बाजी लावून समुद्रात बुडणाऱ्या ११ खलाशांचा जीव वाचवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डहाणूच्या किनाऱ्यावर १९ ऑगस्टला ही घटना घडली. किनाऱ्यापासून सुमारे ६० किलोमीटर खोल समुद्रात भाग्यलक्ष्मी नावाची बोट बुडत होती. यावेळी या बोटीवरील खलाशांनी बिनतारी संदेश यंत्रणेने आठ ते दहा किमी अंतरावर असणाऱ्या पवन साई या बोटीवरील आनंद आणि अशोक अंभिरेंपर्यंत संदेश पाठवला. 


हा संदेश मिळाल्यानंतर पवन साई बोट तात्काळा घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाली. अभिरे पिता-पुत्र याठिकाणी पोहोचले तेव्हा अंधारात फक्त भाग्यलक्ष्मी बोटीवरचा दिवा दिसत होता. यावरुन अंदाज घेत पवनसाई बोट तिथपर्यंत पोहोचली. अंधारात काहीही दिसत नसताना अभिरे पिता-पुत्राने आपला सर्व अनुभव पणाला लावून ११ खलाशांना वाचवले.