ठाणे: भिवंडी शहरात मंगळवारी रात्री तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली पाच जण दबल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खाडीपारच्या रसूल बाग परिसरात ही इमारत होती. प्राथमिक माहितीनुसार, ही इमारत शेजारच्या चाळीवर कोसळली. त्यामुळे जीवितहानीचा धोका वाढला आहे. या घटनेची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली आहे. भिवंडी पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि एनडीआरएफलाही मदत व बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.