रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 'लॉकडाऊन ४' ला उद्यापासून सुरुवात होत आहे. दरम्यान ऑरेंज, ग्रीन, रेड झोन अशा तीन भागात विभागण्यात आले आहे. कोरोना पुर्णपणे बरा होण्याची लसीवर सध्या संशोधन सुरु आहे. पण कोरोनावर मात करण्यासाठी आता होमिओपॅथी मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


होमिओपॅथी Arsenicum album 30 रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधारण साडेचार लाख घरांमध्ये मोफत वाटणार असल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले. आशा वर्कर्सच्या मदतीने या गोळ्यांचे मोफत वाटप होणार असल्याचे ते म्हणाले. कोविड फंड मार्फत हा खर्च केला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.