पालघर: वडराई गावात तपकिरी समुद्री कावळा आढळून आला आहे. वडराई गावातील दिनेश आणि गणेश मेहेर या मासेमारी करणाऱ्या तरुणांना समुद्रकिनारी हा निराळा कावळा दिसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षीतज्ज्ञांच्या मते ब्राऊन बूबी जातीचा हा पक्षी असून त्याला मराठीत 'तपकिरी समुद्री कावळा' असे संबोधले जाते. या पक्ष्यांच्या प्रजाती अटलांटिक आणि पॅसिफिक महासागराच्या बेटांवर तसंच किनाऱ्‍यावर आढळून येतात. दरम्यान या पक्ष्याला दातिवारे समुद्र किनाऱ्‍यावर सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.