ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे हजारो रुपयांची मासळी वाया
ठेकेदाराने कोणतीच पूर्वसूचना दिली नसल्याचा आरोप मासळी विक्रेत्या महिलांनी केला.
अलिबाग: नगरपरिषद स्वच्छता ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे मासळी विक्रेत्यांना मोठया नुकसानीला सामोरे जावे लागत आहे रात्रीच्या वेळी मासळी बाजार स्वच्छ करण्यासाठी मच्छीमारांचे मासळीनं भरलेले बॉक्स ठेकेदाराने मासळी बाजाराच्या बाहेर फेकून दिले.
त्यामुळे अनेकांची मासळी चोरीला गेली तर काहींची मासळी खराब होऊन मोठे नुकसान झाले. ठेकेदाराने कोणतीच पूर्वसूचना दिली नसल्याचा आरोप मासळी विक्रेत्या महिलांनी केला. सध्या मासळी विक्रेत्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. यासंदर्भात नगरपालिकेने हात झटकले आहेत. विक्रेत्यांना रात्रीच्या वेळी बॉक्स ठेवण्यास परवानगी नसल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले.