Breaking News : घाटकोपर पुर्वेतील पारेख हॉस्पिटलच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती.मात्र हे दल घटनास्थळी पोहोचण्यापुर्वी रूग्णांनी आणि इमारतीतील नागरीकांनी एकच पळापळ सुरू केली होती. या रूग्णांना वाचवण्यासाठी मात्र स्थानिक नागरीकांनी खुप तत्परता दाखवली. स्थानिक नागरीकांनी मदत कार्यात खुप हातभार लावला. ज्यामुळे मोठी जिवितहानी टळली. सध्या ही आग नियंत्रणात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाटकोपरच्या पारेख हॉस्पिटलच्या इमारतीच्या खाली असलेल्या हॉटेलला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीची भीषणता इतकी होती की,पहिल्या मजल्यापासून असणाऱ्या रुग्णालयापर्यंत ही आग पोहोचली होती. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता आणि जीव वाचवण्यासाठीची धावपळ सुरु झाली होती. या घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना देण्यात आली होती. मात्र अग्निशमन दल पोहोचण्यापुर्वी स्थानिकांनी मदत कार्यात मोलाची भूमिका निभावली. 


 



स्थानिकांनी मुंबईकर स्पिरिट दाखवत सर्वप्रथम रुग्णांना बाहेर काढण्याचं काम सुरु केले. अनेक रूग्ण खिडक्यांतून उड्या मारण्याचा प्रयत्न करत होते. यावेळेस या नागरीकांनी त्यांना धीर दिला आणि सुखरूप बचावाचे आश्वासन दिले. स्थानिक नागरीकांच्या या धीरामुळे रूग्णांच्या जीवात जीव आला. तसेच रूग्णांमध्ये गोंधळ कमी झाला. यामुळे स्थानिकांनी अनेक रूग्णांना रुग्णालयाच्या दुसऱ्या मार्गानं बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले. तसेच व्हेंटिलेटरवरील रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवलं. स्थानिकांनी मोठं धाडस दाखवत यावेळी आपआपल्या परीनं अग्निशमन दल पोहोचण्याआधीच बचावकार्य हाती घेतलं. 


दरम्यान या घटनेत एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्य़ात य़श आले आहे.