COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील भिरवंडे ग्रामपंचायतीत राणे कुटुंबाला धक्का देत शिवसेनेने विजय मिळवलाय. कणकवलीत पहिलीच ग्रामपंचायत शिवसेनेकडे गेली आहे. नितेश राणेंना जिल्ह्यात पहिला धक्का बसलाय. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीला सुरवात झाली आहे. कणकवलीत भिरवंडे ग्रामपंचायत शिवसेनेकडे आल्याने शिवसैनिकानी जल्लोष केला. 


जिल्ह्यात आज 66 ग्रामपंचायतींची मतमोजणीला सुरवात झाली आहे. जिल्ह्यात एकूण 70 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 4 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत.  भाजपला आणि नितेश राणेंना जिल्ह्यात पहिला धक्का बसला आहे.
 
दुसरीकडे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाली ग्रामपंचायत राखलीय. पाली ग्रामपंचायतीत उदय सामंत यांनी बाजी मारलीय. 11 च्या 11 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत. यापुर्वी पाली ग्रामपंचायतीमधील दहा जागांवर बिनविरोध निवड झाली होती. 



फक्त एका जागेवर निवडणुक होत होती. एका जागेवर सुद्धा सेनेच्या उमेदवारांनी बाजी मारलीय. रत्नागिरी तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेनी बाजी मारलीय. कर्ला, कळझोंडी, खेडशी, गडनरळ, पाली ग्रामपंचायती सेनेकडे गेल्यात. तर ओरी आणि काळबादेवी, कासारी ग्रामपंचायत गाव पॅनलकडे गेलीय.


सावंतवाडी तालुक्यातील आरोस ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे झेंडा फडकला असून 7 पैकी 5 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेयत.