सावर्डे : कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मांडवी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. गेल्या 2 तासांपासून सावर्डे स्थानकातच मांडवी एक्स्प्रेस अडकली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने 2 तास गाडी सावर्डे स्थानकांतच उभी आहे. रत्नागिरीहून दुसरे इंजिन आल्यानंतर ते बदलण्यात येईल. त्यानंतरच कोकण रेल्वे सुरु होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता दुसरं इंजिन येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.


हवामान विभागाकडून येत्या 24 ते 36 तासांपर्यंत कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.