कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. श्रीकृष्णाच्या फक्त बाललिलाच नाही तर त्यांचे उपदेशही तितकेच महत्त्वाचे ठरतात. हे उपदेश श्रीकृष्णाने महाभारतातील युद्ध सुरु होण्याअगोदर केले होते. जर कुणा व्यक्तीच्या जीवनात दुःख असेल तर त्याने या 5 गोष्टी लक्षात ठेवाव्यात. या गोष्टी तुमच्या जीवनात आशेचं किरण घेऊन येतील. ज्यामुळे जीवनात एक प्रेरणा घेऊन सुखाचा शोध करु शकता. 


दुःख आल्यावर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर कुणी दुःखी असेल तर त्या व्यक्तीने भगवद् गीतेतील उपदेश ऐकणे गरजेचे आहे. यामध्ये श्रीकृष्ण सांगतात की, जगात काही स्थैर्य नाही. स्थायी असं नाही. यश आणि अपशय या दोन्हीच गोष्टी अस्थीर आहेत. जर तुम्हाला अपयश आला असेल तर प्रयत्न करणे गरजेचे आहे. कितीही कठीण काळ असला तरीही तुम्ही मेहनतीच्या आणि प्रयत्नांच्या जोरावर यश संपादन करु शकता. 


मोठी स्वप्न 


यश संपादन करण्यासाठी तुम्ही मोठी स्वप्न पाहा. जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमची स्वप्न देखील मोठी असणे गरजेचे असतं. ही स्वप्न फक्त पाहू नका तर ती पूर्ण करण्यासाठी जीवनात प्रयत्नशील राहा. जीवनात मोठी स्वप्न बघणं गरजेचे असते. कारण हीच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत करता. 


रागावर नियंत्रण 


एखादी व्यक्ती रागात असेल तर त्याला योग्य-अयोग्यच भान राहत नाही. अशा परिस्थितीत राग कंट्रोल करणे अत्यंत गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीबरोबर कोणत्या गोष्टी चांगल्या होत नसतील तर त्याचे रागावर नियंत्रण राहत नाही. यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनावर मोठा परिणाम होतो. राग अनावर झाल्यावर माणूस काहीही विचार करतो आणि चुकीचे निर्णय घेतो. 


माफ करणे 


जीवनात पुढे जायचे असेल तर माफ करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सहनशीलता देखील अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला माफ केलंत तर मनात येणारे चुकीचे विचार सहज निघून जातात. शत्रूची भावना संपून जाते. तसेच सहनशीलता असल्यामुळे रागावर नियंत्रण मिळवणे सोपे होते. 


(हे पण वाचा - जन्माष्टमीनिमित्त चिमुकल्यांना असं करा तयार, बाळात दिसेल बाळ कृष्णाची सावली) 


जीवनात सकारात्मक बदल 


बदल हा प्रकृतीचा नियम आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी काही ना काही जीवनात करणे आवश्यक आहे. यामुळे जीवनात यश संपादन करणे अत्यंत गरजेचे होते. यशस्वी होण्यासाठी जीवनातील अनेक समस्या सोडावणे गरजेचे असते. यामुळे जीवनात समाधान आवश्यक आहे.