Suchitra Bandekar Birthday : 'नसतेस घरी तू जेव्हा... ' हे गाणं पोस्ट करत अभिनेता आदेश बांदेकरांनी पत्नी-अभिनेत्री सुचित्रा बांदेकरच्या वाढदिवसादिवशी भावना व्यक्त केल्या आहेत. आदेश आणि सुचित्रा बांदेकर मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांनी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदेश आणि सुचित्रा बांदेकर कायमच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. संपूर्ण महाराष्ट्राला या दोन्ही कलाकारांच मनापासून कौतुक आहे. 1990 साली आदेश आणि सुचित्रा यांनी  प्रेमविवाह केला. या दोघांच्या नात्यांमधून प्रत्येक कपल्सने शिकाव्यात या गोष्टी. 


असे पडले प्रेमात


आदेश बांदेकर आणि  सुचित्रा बांदेकर या दोघांची 'रथचक्र' या मालिकेत ओळख झाली. पहिल्या नजरेतच आदेश बांदेकर प्रेमात पडले. सुचित्रा यांच्या घरातील वातावरण अतिशय कडक शिस्तीचे असल्यामुळे दोघे लपून छपून भेटत. पण सुचित्रा यांच्या घरातून या नात्याला कडाडून विरोध असल्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. लग्नाला 33 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही हे दोघे एकमेकांना खंबीर साथ देत आहेत. 


आदेश बांदेकरांची भावनिक पोस्ट 



पळून जाऊन केले लग्न 


घरातून विरोध असल्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्नाचा निर्णय घेतला. मात्र आज 32 वर्षांच्या या दोघांच्या सुखी संसाराने गोकुळ एकत्र आणले. आपण अनेकदा या दोघांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये कुटुंबाचे फोटो शेअर पाहिले आहेत. या दोघांनी आपल्या प्रेमाने दोन्ही कुटुंबाला एकत्र आणलंय. आदेश-सुचित्रा या दोघांकडून प्रत्येकाने या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. 


मनापासून घेतात काळजी 


आदेश-सुचित्रा कायमच एकमेकांची प्रेमाने आणि मनापासून काळजी घेतात. आदेश बांदेकरांना जेव्हा दुधीच्या रसातून विषबाधा झाली तेव्हा बांदेकर कुटुंबासमोर मोठं संकट ओढावलं होतं. पण बांदेकरांच देव बलवत्तर म्हणून ते या सगळ्यातून बचावले. तेव्हा आदेश यांनी सांगितलं होतं की, मी डोळे उघडले तेव्हा सुचित्रा, सोहम आणि उद्धव ठाकरे माझ्या समोर होते. यामधून या कुटुंबाची प्रेमाने काळजी घेण्याचा स्वभाव दिसतो.  


एकमेकांच भरभरून कौतुक 


आदेश आणि सुचित्रा दोघेही एकमेकांच भरभरून कौतुक करताना दिसतात. दोघं एकमेकांच्या स्वभावाचे आणि कामाचे कौतुक करताना दिसतात. आदेश आणि सुचित्रा यांचा सोहम हा मुलगा देखील अभिनय क्षेत्रात आहे. हे तिघेही एकमेकांच भरभरून कौतुक करतात एवढंच नव्हे तर यांच नातं प्रेम आणि विश्वासावर टिकून आहे. एकमेकांचा आदर सन्मान करणे हे यांच्याकडून शिकावे.