ऐश्वर्या राय बच्चनने बुधवारी आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. या दिवशी लेक आराध्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आराध्या आणि ऐश्वर्या अनेकदा एकत्र दिसतात. अनेकदा आराध्याला ऐश्वर्या कंट्रोल करत असल्याचं सांगून ट्रोलही झाली. पण आज पहिल्यांदा आराध्याने सगळ्यांची बोलती बंद करुन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. आराध्यासाठी तिची आई ऐश्वर्या ही एक आदर्श आहे.  ऐश्वर्या रायने लेकीवर केलेल संस्कार किती वेगळे आहेत, हे दिसतात. प्रत्येक पालकांनी याचा विचार करावा.


वाढदिवसादिवशी खास कृती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्याने तिची आई वृंदा राय आणि मुलगी आराध्या बच्चन यांच्यासह कर्करोगग्रस्तांच्या कल्याणासाठी आयोजित केलेल्या एका खास कार्यक्रमात हजेरी लावली होती. पांढऱ्या पोशाखात, ऐश्वर्या तिच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी मंचावर आली तेव्हा ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी आराध्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केली. या वेळी राय कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र होत्या. 


काय म्हणाली आराध्या 


आराध्याने तिच्या आईच्या समाजसेवेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली की, “मला वाटते की तू जे समाजसेवेच कार्य करत आहे ते खरोखर महत्वाचे आणि खरोखर अद्भुत आहे. हे खरोखर समृद्ध आणि परिपूर्ण आहे. हे जगाला मदत करत आहे, आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाला मदत करत आहे, लोकांना मदत करत आहे. आणि मला एवढेच सांगायचे आहे की तू जे करत आहात ते खरोखरच अविश्वसनीय आहे.”


11 वर्षांच्या आराध्याच्या या व्हिडीओने सगळ्यांचच लक्ष वेधलं आहे. ऐश्वर्याने मुलीला दिलेले संस्कार खरंच वेगळे असल्याचं स्पष्ट होतं. 


हक्क गाजवू नये 


पालक म्हणून ऐश्वर्या आराध्यावर कधीच हक्क गाजवत नाही. ऐश्वर्याने एका मुलाखतीत सांगितलं की, ती कधीच आराध्यावर हक्क गाजवत नाही. पालक म्हणून मुलांचा विचार करायला हवा. त्यांचा आनंद अधिक महत्त्वाचा आहे. 


सुरक्षित आणि प्रेम 


मुलांना कायम पालकांसोबत सुरक्षित आणि प्रेम वाटलं पाहिजे. हे अत्यंत गरजेचे आहे. ऐश्वर्या कायमच आराध्यासोबत दिसते. अनेकदा ती ट्रोलही होते पण आराध्याला प्रेम देताना आणि तिला सुरक्षित कसे वाटेल याची काळजी घेते. 


मुलांना व्यक्त होऊ द्या 


आपण या व्हिडीओत पाहू शकता आराध्या मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. ऐश्वर्या लेकीकडे भावूक नजरेने पाहताना दिसत आहे. ऐश्वर्याने आराध्याला व्यक्त व्हायला शिकवंल आहे. पालकांनी या गोष्टी शिकणे गरजेचे आहे.