आई आणि मुलं यांचं नातं इतर नात्यांपेक्षा अधिक घट्ट असतं? आपल्या मुलाला काय आवडतं? तिथपासून मुलाच्या चेहऱ्यावरील प्रत्येक हाव भाव आई ओळखत असते. आई म्हणून जगत असताना अनेकदा तिच्या स्वतःच्या गोष्टी मागे राहतात. कारण जेव्हा ती एखाद्या बाळाला जन्म देते तेव्हापासून ती फक्त आणि फक्त बाळासाठी जगत असते. तिच्या संपूर्ण जीवनावर बाळाच्या विचारांचं अधिराज्य असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशावेळी आईसाठी कधीच रविवार नसतो. म्हणजे तिला कधीच सुट्टी नसते. टिस्का चोप्रा म्हणते की, उलट रविवारच्या दिवशी आई सर्वात जास्त व्यस्त असते. मुलांच्या संगोपनात व्यस्त असलेल्या आईबद्दल टिस्का काय सांगते? लेकीचं संगोपन करत असताना कोणत्या गोष्टी ती कटाक्षाने पाळते ते जाणून घेणं गरजेचं आहे. 


टिस्का चोप्राच्या पॅरेंटिंग टिप्स?



आईसाठी कधीच सुट्टी नसते


अभिनेत्री, लेखिका निर्माती आणि एका गोंडस मुलीची आई असलेली टिस्का चोप्रा आपल्या पॅरेंटिंगचा अनुभव शेअर करताना सांगते की, आईसाठी कधीच सुट्टीचा वार नसतो? कारण आई कायमच कामात असते. आईचा रविवार कायमच असंख्य कामांनी भरलेला असतो. वर्किंग मदर असलेल्या अनेक आईंचा हा अनुभव आहे. 


मुलं पालकांच्या कोणत्या गोष्टी कॅरी करतात? 


मुलं पालकांकडून असंख्य गोष्टी शिकत असतात. मुलं फक्त तुमचे डीएनए कॅरी करत नाहीतर तर ते तुमचे स्पिरिच्युऍलिटी देखील घेत असतात.  त्यामुळे मुलांच्या वागणुकीत पालाकांचा मोठा वाटा असतो. अशावेळी पालकांनी मुलांचे मूड स्विंग्स असो किंवा ते क्रँकी असतील तर ते तुमच्या सारखेच वागत असतात हे विसरू नका. मुलं हे पालकांचे प्रतिबिंबच असतात. त्यामुळे तुम्ही काय वागता? हे अत्यंत महत्त्वाचे असते. 


मुलाला मोठं होताना बघण्यासारखा आनंद नाही 


टिस्का चोप्रा म्हणते की, मुलांना मोठं होत असताना त्याला पाहण्यासारखं आनंद नाही. कारण मुलं तुमचा विचार कॅरी करत असतात. तुम्हाला बघून ते मोठे होत असतात. अशावेळी त्यांच्यात होणारा बदल पाहणे यासारखे सुख पालकांसाठी काही नाही. मुलं जर चुकीचं वागत असतील तर ते पालकांचंच रिफ्लेक्शन आहे हे विसरता कामा नये. त्यामुळे पालकांनी मुलांसमोर वागताना नीटच वागावे. तसेच मुलांमधील होणारे सकारात्मक बदल अतिशय महत्वाचं असल्याच टिस्का सांगते. पुढे टिस्का म्हणाली की, तुमचे मूल हा तुमचा आरसा आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पाहू शकता. मी माझ्या मुलीला असेच पाहतो. याशिवाय, आपल्या मुलाला आपल्या मांडीवर बसवून त्याला/तिला आपल्याकडे पाहणे यापेक्षा सुंदर काहीही नाही.