Ambani family drinks milk of this dairy : रिलायन्स उद्योग (Reliance) समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील सर्वात मोठे आणि नामवंत उद्योगपती (Businessmen) आहेत. अंबानींच्या श्रीमंती प्रमाणेच नेहमीच चर्चा असते ती अंबानी कुटुंबाच्या लाईफस्टाईलची. अंबानीच्या घरी काय खातात याची देखील चर्चा होते. अंबानींच्या किचनमध्ये उच्च दर्जाचे खाद्य पदार्थ वापरले जातात. अंबनीच्या घरी वापरले जाणारे दूधही तितकेच खास आहे.  अंबानींच्या घरी पुण्याच्या डेअरीचे दूध येते.


 हे देखील वाचा... मुंबईतील टॉप 10 पर्यटन स्थळे; यापैकी बरीचं ठिकाणं अनेकांनी मुंबईत राहूनही पाहिली नसतील?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वचजण दूध पितात. पण, अंबानींच्या घरी एका खास गाईचे दूध येते. हे दूध पुण्याच्या डेअरीतून येते. अंबानी कुटूंबिय होल्स्टेन प्रेसियन या खास विदेशी जातीच्या गायीचे दूध पितात. ही गाय स्विस जातीची असून तिचे दूध अतिशय पौष्टिक आहे. या जातीची गाय दररोज 25 लिटर दूध देते. या गाईच्या दूधात कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि प्रथिने भरपूर असतात. अंबानी यांच्या घरी पुण्यातील 'भाग्यलक्ष्मी' डेअरीतुन दूध येते. फक्त अंबानीच नाही तर अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, हृतिक रोशन यासारखे सेलिब्रिटींच्या घरांमध्ये याच डेअरीचे दूध जाते.


देवेंद्र शहा हे या डेअरीचे मालक आहेत. शहा यांच्या फार्ममध्ये तब्बल 4,000 डच होल्स्टीन गायी आहेत. या गायी  दर दिवशी 25 हजार लिटरपेक्षा दूध देतात. या गायींना फक्त ROचेच पाणी दिले जाते. या गाईंना सोयाबीन, अल्फा गवत, ऋतुमानानुसार भाज्या आणि मक्याचा चारा दिला जातो. ची प्रकृती ठणठणीत राहावी यासाठी हिमालय ब्रँडच्या आयुर्वेदिक औषधीही दिल्या जातात. येथे खुराकीतूनच त्यांच्या दुधातील फॅट कंट्रोल केले जाते. फ्रीझिंग डिलिव्हरी व्हॅनने  या दुधाची मुंबईत डिलव्हरी केली जाते.