अमृता प्रसादला मारते `या` नावाने हाक; प्रेम म्हणजे Companionship म्हणत देतात नात्याचे धडे
Amruta Prasad Relationship : अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकत आहे. अमृता प्रेमाने प्रसादला कोणत्या नावाने हाक मारते आणि त्या मागचं कारण अतिशय इंटरेस्टिंग आहे. (Relationship Tips from Amruta And Prasad)
What is Companionship : मराठी सिनेसृष्टीतील एक जोडी प्रेक्षकांच मन जिंकत आहे. ती म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे. बिग बॉस मराठीतून हे दोघं एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले. अमृता आणि प्रसादने 22 जुलै रोजी गुपचूप साखरपुडा उरकला आणि सोशल मीडियावर फोटो शेअर केले. यानंतर दोघांनी लग्नाबद्दलही माहिती दिली. लवकरच लग्नबंधनात अडकणारे अमृता आणि प्रसाद एकमेकांबद्दल प्रेमाने बोलताना दिसतात. अमृता आणि प्रसाद नात्यामध्ये बोलताना प्रेम म्हणजे काय? आणि नात्यातील गोडवा कसा जपावा? याबद्दल अतिशय प्रेमाने सांगतात.
अमृता प्रसादला 'या' नावाने मारते हाक?
प्रेमाने अनेकजण एकमेकांना टोपण नावाने हाक मारतात. मग कधी ते "बच्चा', 'सोना' असं असतं. पण अमृता मात्र प्रसादला अतिशय हटके नावाने हाक मारते. ते म्हणजे 'सगुणा'. अमृता प्रसादला सगुणा नावाने हाक मारते. यामागचं कारणही तसंच इंटरेस्टिंग आहे. प्रसाद अतिशय सुंदर स्वयंपाक करतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो घर खूपच छान आवरतो. यामुळे अमृता त्याला या नावाने हाक मारते.
अमृता-प्रसादच्यामध्ये Companionship म्हणजे काय?
नात्यामध्ये जोडीदार अतिशय महत्त्वाचा असतो. प्रसाद हा उत्तम जोडीदार असल्याच अमृता सांगते. एकमेकांना समजून घेताना अमृता म्हणते की, प्रसादकडून कोणतीही अपेक्षा न करता तो सगळ्या गोष्टी अगदी सहज करतो. एकमेकांना न सांगता एकमेकांसाठी करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. यामुळे नातं अधिक खुलतं जातं आणि एकमेकांवरच प्रेम चिरंतर राहतं. जोडीदाराचं सोबत असणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
न बोलता बरंच काही
अमृता आणि प्रसाद दोघंही वर्किंग आहेत. कामात व्यस्त असतात मात्र अशावेळी जोडीदाराकडून कळत नकळत अपेक्षा केल्या जातात. प्रसाद अमृताला याबाबतीत अत्यंत मदत करतो. जोडीदारालास समजून वागणं अत्यंत गरजेचं असतं. अनेकदा जोडीदाराने न सांगता केलेल्या गोष्टीचा आनंद खूप वेगळा असतो. प्रेमात आदर, सन्मान असला तर ते नातं अधिक घट्ट होतं. प्रसाद आणि अमृता त्यांच्या नात्यातून याच टिप्स देताना दिसतात.
एकमेकांना जपणं
नात्यामध्ये प्रेम तर असतंच पण ते चिरंतर राहावं म्हणून एकमेकांना जपणं अत्यंत गरजेचं असतं. अशावेळी प्रसाद अमृताची विशेष काळजी घेताना दिसतो. यावेळी अमृता एक किस्सा सांगते की, नाटकाच्या प्रयोगाला जाताना तिची चप्पल तुटते. घाई असल्यामुळे ती चप्पल तशीच घालून जाते. नंतर ती प्रयोगात व्यस्त होते पण प्रसाद तिची तुटलेली चप्पल दुरुस्त करुन आणतो. अमृताला ही गोष्ट खूप महत्त्वाची वाटते.