आपल्या देशात अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. प्रत्येकाचं वेगळे महत्त्व देखील आहे. देशात अनेक देवीचीही फार जुनी मंदिरं आहेत. आजपासून सुरु झालेल्या शारदीय नवरात्री 2024 च्या सणाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशाच एका अनोख्या मंदिराविषयी सांगणार आहोत. आज आपण ओडिशातील एका प्राचीन मंदिराविषयी जाणून घेणार आहोत जे नवरात्रीच्या काळात वर्षातून केवळ नऊ दिवस भक्ताना दर्शनासाठी उघडले जाते. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेला शारदीय नवरात्रीचा पवित्र सण आजपासून सुरू झाला आहे. हा सण दरवर्षी अश्विन महिन्यात येतो. या काळात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा नऊ दिवस केली जाते. अनेक भक्त या काळात उपवासही करतात. याशिवाय या दिवसात देवीच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते. 


ओडिसाचे दुर्गा मंदिर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिसामध्ये अनेक मंदिर आहेत. खरतर  साधारणपणे ओडिसाचे नाव ऐकल्यावर मनात पहिला विचार येतो तो म्हणजे जगन्नाथ पुरीच्या मंदिराचा. पण तुम्हाला महित आहे का की, ओडिसात देवीचे एक अनोखे मंदिर आहे. गजपती जिल्ह्यातील परलाखेमुंडी येथे एक छोटेसे दुर्गा मंदिर आहे. हे मंदिर नवरात्रीच्या वेळीच उघडते. या मंदिराबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. 


हे ही वाचा: Navaratri 2024: नवरात्रीमध्ये धान्य पेरण्याचा योग्य मार्ग माहितेय? 'ही' आयडिया करा फॉलो, १ दिवसात फुटू लागतील अंकुर


वर्षभर बंद असतो दरवाजा 


हे मंदिर नवरात्रीत वर्षातून केवळ नऊ दिवस उघडे राहते. या जुन्या मंदिराला नवरात्रीच्या काळात ओडिसा आणि आंध्र प्रदेशातील लोक मोठ्या संख्येने भेट देतात. हे मंदिर वर्षभर बंद राहते आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्येच खुले असते. वर्षातून केवळ नऊ दिवस मंदिर उघडण्याची ही परंपरा अज्ञात काळापासून सुरू आहे आणि याचे कारणही अज्ञात आहे.


हे ही वाचा: Navratri 2024: नवरात्रीचा उपवास करणार आहात? आधीच बनवून ठेवा उपवासाची भेळ, नोट करा Recipe


वर्षभर जुना प्रसाद 


नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या मंदिराचे दरवाजे उघडले जातात. यानंतर, तिथे पूजा सुरु होते.  अनेक विधी केले जातात, जे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत चालू असतात. यानंतर मातीच्या भांड्यात नारळाचा प्रसाद ठेवला जातो. हा प्रसाद मंदिराचा दरवाज्याच्या इथे ठेवला जातो आणि दरवाजा वर्षासाठी बंद केला जातो. विशेष बाब म्हणजे पुढच्या वर्षी मंदिराचा दरवाजा उघडल्यावर तो प्रसाद तसाच राहतो, जो नंतर नवरात्रीच्या काळात मंदिरात येणाऱ्या भाविकांना दिला जातो.


हे ही वाचा: Navartri 2024: नवरात्रीत कांदा आणि लसूण खाण्यापासून राहा दूर, शरीराला मिळतील 'हे' फायदे


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)