प्रत्येक पालकाला असे वाटते की,आपल्या मुलाने कायम जीवनात यशस्वी राहावे आणि त्याने जगावर राज्य करावे. अशावेळी जर लेकीसाठी नाव शोधत असाल. तर असं नाव निवडा जे तिला साजेसं असेल. अनेकदा आपल्या घरात मूल जन्माला आले की आपल्या जबाबदाऱ्याही वाढतात कारण त्याच्यासाठी नाव निवडायचे असते. आज या लेखात तुमची ही जबाबदारीचे ओझे थोडे कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या पालकांची मुलगी लक्ष्मीचा जन्म नुकताच झाला आहे त्यांच्यासाठी आजचा लेख खूप उपयुक्त ठरणार आहे. आज आम्ही तुमच्या मुलीसाठी काही अतिशय सुंदर आणि दुर्मिळ नावांची यादी घेऊन आलो आहोत. 


आपल्या राजकुमारीसाठी काही दुर्मिळ नावे


अव्या: या नावाचा अर्थ सूर्याचा पहिला किरण आहे.
आरवी: हे नाव आनंद आणि सुसंवाद दर्शवते.
चैताली : हे नाव अत्यंत दुर्मिळ आहे जे चैत्र महिन्यात जन्मलेल्या मुलींना दिले जाते.
दिविजा: या नावाचा अर्थ स्वर्गात जन्मलेला असा होतो.
ईला: या नावाचा अर्थ पृथ्वी आहे.
ह्रदिनी: या नावाचा अर्थ विजेचा लखलखाट.
इनिका: या नावाचा अर्थ लहान जग आहे.
मीहिका: या नावाचा अर्थ धुके किंवा धुंदी आहे.
नम्या: या नावाचा अर्थ आदरास पात्र आहे.
ऋषिमा: या नावाचा अर्थ चंद्राचा प्रकाश आहे.
अहान : हे नाव आधुनिक आणि सुंदर आहे. आहान या नावाचा अर्थ प्रकाशाचा पहिला किरण आहे. किरणाप्रमाणे तेजस्वी असा याचा अर्थ आहे.
अश्रिथ : A अक्षराने सुरू होणाऱ्या मुलीला एक अद्वितीय नाव द्यायचे आहे.  हे नाव संस्कृत भाषेतून आले आहे. धनसंपत्ती, राणी असं या नावाचा अर्थ आहे.