Benefits of matar peels fertilizers for plants : थंडीच्या दिवसात बाजारात हिरवे मटर म्हणजे वाटणे बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. याच ऋतुमध्ये ताजे हिरवे वाटाणे मिळतात, त्यामुळे आपणही ते भरपूर प्रमाणात घेत असतो. मात्र या हिरवे वाटण्यांची भाजी सोबतच इतर गोष्टींसाठी वापर करु शकतो.  जसे की भाजी शिजवण्यासाठी हिरवं वाटणाचे टरफल सोलून आपण त्याचा वापर करतो. पण तुम्ही सोलले टरफल टाकून देत असाल तर ती चूक पुन्हा करु नका. कारण याच टरफलांचा वापर तुम्ही झाडाचे खत बनवण्यासाठी करु शकता. यासाठी नेमकं कोणत्या स्टेप आहेत त्या जाणून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा भाजी बनवून झाल्यानंतर हिरवे वाटाण्यांचे टरफल आपण कचऱ्यात फेकून देत असतो. मात्र कचरा असणारा हा पदार्थ झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे. ज्याप्रमाणे केळीच्या साली, कांद्यांची टरफलं यांचं पाणी झाडांसाठी एक उत्तम टॉनिक आहे त्याचप्रमाणे हिरवे वाटाणाचे टरफलं देखील झाडांसाठी एकप्रकारे मॅजिकल वॉटर आहे. 


झाडांसाठी हिरवे वाटाण्यांचा उपयोग


झाडांसाठी हिरवे वाटण्याची टरफलं कशी वापरायची याची माहिती passionate_for_creation या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 




याचा वापर करण्यासाठी मटारच्या टरफलांचे बारीक तुकडे करून घ्या आणि हे सगळे तुकडे थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या. आता या वाटणामध्ये थोडं पाणी घाला आणि ते गाळणीने गाळून घ्या. साधारणपणे हे पाणी जेवढं असेल त्याच्या आणखी तीनपट पाणी त्यात टाका आणि हे पाणी थोडं थोडं करून सगळ्या झाडांना घाला. मटारचे वाटण गाळून घेतल्यानंतर गाळणीत जो चोथा उरला असेल तो चोथा वाळवा आणि नंतर कुंडीतल्या मातीत थोडा- थोडा करून टाकून द्या. यामुळेही झाडांना फायदा होईल.


आणखीन काही उपाय


झाडांची वाढ चांगली होत नसले तर आणखीन काही उपाय आहेत. ज्यामुळे झाडांची चांगल वाढ होऊ शकते. पिझ्झा, ब्रेड हे पदार्थ करताना आपण ते पदार्थ छान फुलावेत यासाठी यीस्ट वापरतो. आता तेच यीस्ट तुमची बाग छान फुलावी म्हणून वापरून पाहा. एक कप पाणी घ्या आणि त्यात 1 टीस्पून यीस्ट घाला. तासाभराने हे मिश्रण झाडांवर फवारा. झाडांची पानं छान हिरवीगार होतील. एक कप पाण्यात 1 टीस्पून यीस्ट आणि 1 टीस्पून बेकिंग सोडा घाला. हे मिश्रण मातीमध्ये टाका. यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन झाडांची वाढही भराभर होते. महिन्यातून एकदा हा उपाय करा.


एक कप पाण्यात 1 टीस्पून यीस्ट आणि बटाट्याच्या बारीक चिरलेल्या अर्धी वाटी फोडी घाला. हे मिश्रण झाडांना घातल्याने झाडाला भरपूर फुलं येतील. 1 कप पाणी, 1 टीस्पून यीस्ट आणि १ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर असं एकत्र करून झाडांना दिल्यास माती कायम भुसभुशीत राहते. मातीला कडकपणा येत नाही.