चाणक्य नीतिमध्ये सांगितलंय, पत्नीपासून लपवाव्यात `या` गोष्टी, नाहीतर पतीला मोजावी लागेल मोठी किंमत
तुमचं वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी चाणक्य नीतिमध्ये नवऱ्याला काही गोष्टी पत्नीपासून लपवण्यास सांगितलं आहे. खालील गोष्टी तुमचं लग्नानंतर आयुष्य खराब होऊ शकतं. यामुळे या गोष्टी जाणून घ्या.
जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे? याबाबत आचार्य चाणक्य नीतिमध्ये मार्गदर्शन केलंय. चाणक्य नीतिमध्ये सुखी जीवनाचे टिप्स सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, जर तुम्हाला वैवाहिक जीवनात आनंदी रहायचे असेल तर काही गोष्टी पत्नीपासून लपवून ठेवा. या अशा गोष्टी आहेत ज्या प्रत्येक पतीला माहित असणे आवश्यक आहे, जेणेकरून ते आपल्या पत्नीसोबत शेअर करण्याची चूक करू नये. चला तर मग आम्ही तुम्हाला तुमच्या पत्नीपासून लपवून ठेवण्याच्या खास गोष्टी सांगत आहोत.
उत्पनाबद्दल सगळी माहिती देऊ नका?
चाणक्य नीतीनुसार पतीने आपल्या कमाईची प्रत्येक गोष्ट पत्नीला सांगू नये. जरी बायका पैसे वाचवत असल्या तरीही नवऱ्याने आपल्या पगाराबद्दल कुणाशी काही शेअर करु नये? पण अनेक वेळा, जेव्हा तिच्या पतीचे उत्पन्न जास्त असते तेव्हा ती स्वतःला खर्च करण्यापासून रोखू शकत नाही. मग अनावश्यक खर्च वाढू लागतो. अशा स्थितीत वेळ आल्यावर पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागतो.
आपली कमकुवत बाजू सांगू नका
आचार्य चाणक्य यांचे धोरण असे सांगते की, पतीने नेहमी आपल्या पत्नीपासून आपले कमजोरी लपवले पाहिजे. कारण तुमच्या दुर्बल बाजूचा उल्लेख कधी तुम्हाला कमीपणा दाखण्यासाठी होऊ नये. कारण कधी-कधी पत्नीही पतीच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन आपले काम करून घेऊ शकते. त्यामुळे घर आणि समाजात अपमानाला सामोरे जावे लागू शकते.
गुप्त दान करा
गुप्त दान हे श्रेष्ठ दान आहे असे म्हणतात. एका हाताने दान करा म्हणजे दुसऱ्याला कळू नये. हे एक सेवाभावी कार्य असून प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार देणगी देते. अशा परिस्थितीत आचार्य चाणक्य यांनी दानाची माहिती पत्नीपासून लपवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कारण दानाबद्दल पत्नीला सांगूनही त्याचे महत्त्व कमी होऊ शकते.
अपमानाबद्दल सांगू नका
चाणक्य नीतीनुसार पतीने आपल्या पत्नीला चुकूनही आपल्या अपमानाबद्दल सांगू नये. कारण कोणतीही पत्नी आपल्या पतीचा अपमान सहन करू शकत नाही. मग बदला घेतल्याशिवाय त्याला शांती मिळत नाही. त्यामुळे अनेकदा वाद वाढतात. म्हणून, आपल्या पत्नीला अपमान किंवा मारामारीबद्दल सांगू नका. अशा घटनांमध्ये पुन्हा पुरुषाची द्विधा मनस्थिती होती. त्यामुळे पुरुषांनी असा प्रसंग ऐकट्याने हाताळावा.